crime (फोटो सौजन्य: social media)
ठाणे: डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. तिला धमकी देत प्रेमाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून संबंधित तरुणाला अटक केली आहे.
इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणात मोठी अपडेट: २० कोटींची करचोरी उघड; आरोपीला कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा
नेमकं काय आहे प्रकरण?
आरोपीचा नाव रमेश राठोड असे आहे. मुलगी कॉलेजला जात असताना रमेश तिचा पाठलाग करत होता. तो तिला वारंवार प्रेमाला हो म्हणं असं बोलत होता. मात्र, मुलीने नकार दिल्यांनतर त्याने मुलीची छेडछाड करायला सुरुवात केली. स्वतःच्या हाताची नस कापण्याची तिला धमकी दिली आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रमेश राठोडला अटक केली. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
एसीपी सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश राठोड यांने फिर्यादी मुलीचा गेल्या चार पाच महिन्यापासून पाठलाग करत होता. पाठलाग करून रिलेशनशिप करण्यास सांगत होता. रिलेशनशिप न केल्यास हाताची नस कापून घेईन असं सांगत होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं सुहास हेमाडे यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणाचा चाकू हल्ला, तरुणी बचावली पण
एकतर्फी प्रेमातून एका मुस्लीम तरुणाने मराठी मुलीवर प्राणघात हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हा प्राणघातक हल्ला मेडीकल चालकाने स्वतःवर झेलल्यामुळे तरुणी बचावली असली तरी मेडीकल चालक मात्र गंभीररित्या जखमी झाला आहे. भर दिवसा नालासोपारातील टाकीपाड्यात घडलेल्या या घटनेमुळे येथील तरुणींमध्ये भितीचे वातावरण पसरले असून हल्लेखोराला पकडण्यात पोलीसांना अद्याप यश आलेले नाही.
पश्चिमेकडील करारी राईस मिल समोरील पुरववाडी इमारतीत विशाल आवारे यांचे लोट्स मेडीकल स्टोअर आहे.त्यात काम करणाऱ्या एका तरुणीला येथील एक मुलगा साहील शेख हा मोबाईलवरुन आणि रस्त्यात अडवून धमक्या देत होता. सदर बाब तिने मेडीकल चालक आणि आपल्या पालकांना सांगितल्यामुळे संतप्त होवून साहील शेख ने सोमवारी सायंकाळी तिचे घर गाठले.तिथे ती न सापडल्यामुळे तो लोट्स मेडीकलमध्ये गेला आणि तिथे तिला अश्लिल शिवीगाळ करुन चाकू हल्ला केला. मात्र,त्याचवेळी प्रसंगावधान राखून मेडीकल चालक विशालने तिला बाजुला केले, मात्र चाकु हल्ल्यात त्याच्या गालावर जखम झाली. त्यानंतर साहीलने पुन्हा चाकूचा वार केल्यावर विशालच्या हातावर तो वार झाला.
परभणीच्या कुंभार पिंपळगाव येथील ज्वेलर्समध्येच चोरी; तब्बल 20 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास