Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात

हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 10:44 AM
Accident: गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात
Follow Us
Follow Us:

जगबुडीच्या कठड्यावर गेली कार
मुंबई गोवा महामार्गावरील भरणेजवळ अपघात
खेडमध्ये घडली घटना

खेड: मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीकच्या नव्या जगबुडी पुलावर रत्नागिरीकडे जाणाच्या कार चालकाचे अचानक नियंत्रण सुटून कार कार थेट जगबुडी नदीच्या कठड्यावर जाऊन चढली. मात्र या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. अपघात इतका भीषण होता की, कार थेट नदीकाठी असलेल्या कठड्यावर जाऊन अडकली. कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला असून गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणालाही दुखापत झाली सुदैवाने नाही.

हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूकही मंदावली होती. प्रत्यक्षदर्शीच्या मते, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट कठड्‌याकडे झेपावली.

चालकाने शेवटच्या क्षणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी गाडी कठड्यावर जाऊन अडकली. या घटनेत चालकाचे दैव बलवत्तर
ठरले. जर कार कठड्यावर न अडकता पुढे गेली असती, तर ती थेट १०० ते १५० फूट खोल जगबुडी नदीच्या पात्रात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामात परिसरात सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसन्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली, एक ट्रक गोवा ते मुंबई या दिशेने जात असताना ओणी सिकंदामाळ येथील एका धान्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. याच दरम्यान गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुसन्या भरधाव ट्रकने या उभ्या ट्रकला पाठीमागून भीषण भडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुसऱ्या ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या ट्रकच्या मालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत  केली, घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. महामानांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. राजापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Driver lose control on car accident jagbudi river khed ratangiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Accident
  • Accident Case
  • Khed

संबंधित बातम्या

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
1

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
3

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी  अन्…
4

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.