Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा पर्दाफाश! गुजरात कनेक्शन उघड; ४४०० नशा गोळ्यांसह दोघांना बेड्या

शहाबाजार मधील अश्फाक पटेलचा अड्डा उद्धवस्त केल्याच्या आनंदात असतानाच मंगळवारी छावणीतील चांदमारी भागात बटन गोळ्या आणि सिरपचा मोठा साठा पकडण्यात आला असून याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समोर आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 02:40 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ड्रग्ज सिंडिकेट'चा पर्दाफाश! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ड्रग्ज सिंडिकेट'चा पर्दाफाश! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा पर्दाफाश!
  • गुजरात कनेक्शन उघड
  • ४४०० नशा गोळ्यांसह दोघांना बेड्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या शहराबरोबर नशा सम्राटांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून अड्डे उभे केले आहेत. मागील आठ दिवसांपासून दररोज नशेखोरांवर कारवाई होत असली तरी म्होरके पोलिसांच्या हाती लागत नाही. दरम्यान शहाबाजार मधील अश्फाक पटेलचा अड्डा उद्धवस्त केल्याच्या आनंदात असतानाच मंगळवारी छावणीतील चांदमारी भागात बटन गोळ्या आणि सिरपचा मोठा साठा पकडण्यात आला असून याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समोर आले आहे. ही कारवाई अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या (एएनटीएफ) पथकाने केली असून तौफिक रशीद अली आणि सय्यद अझर सय्यद अकबर (दोघे रा. कश्मिर मोहल्ला, चांदमारी) यांना अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या (एएनटीएफ) पथकाने चार दिवसांत दोन कारवाया करून सुमारे ४ हजार ४०० गोळ्या, सिरपच्या १३२ बाटल्या जप्त करून दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीत चांदीमारी नशेखोरांचे अनेक अड्डे तयार झाल्याचे उघड होत आहे. कारवाई संदर्भात माहिती देताना एएनटीएफचे पोलिस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले की, तौफिक रशीद अली आणि सय्यद अझर सय्यद अकबर (दोघे रा. कश्मिर मोहल्ला, चांदमारी), अशी आरोपींची नावे आहेत. तौफिकला ६ तर अझरला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, आरोपी सय्यद अझर हा गुजरातहून ट्रॅव्हल्सने शहरात नशेच्या बटन गोळ्या आणि सिरपच्या बाटल्यांचा साठा घेऊन येणार असल्याची खबर एएनटीएफ पथकाला मिळाली.

घातपाताच्या तयारीतील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

शनिवारी रात्री नगरनाका येथे सापळा रचून ट्रॅव्हल्स रोखून २ हजार बटन गोळ्या आणि सिरपच्या ११८ बाटल्या जप्त केल्या होत्या. मात्र, तेव्हा सय्यद अझर हा माल टाकून पळून गेला होता. सोमवारी रात्री पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक पोलिस निरीक्षक दिपाली पाटील, हवालदार नितीन जाधव, रवींद्र साळवे, कैलास गाडेकर, हरीष मुंढे, अतुल तुपे, राहुल काळे, ज्योती किर्तीकर, आम्रपाली सूर्यवंशी यांच्या पथकाने अझरला पकडले. चौकशीत चांदमारीतील सिंडिकेटची माहिती मिळाल्यावरुन मंगळवारी तौफिक रशीद अली हा नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी घाटी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ येणार असल्याचे समजले. पथकाने तेथे सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून २ हजार ४०० बटन गोळ्या आणि सिरपच्या १४ बाटल्या जप्त केल्या. त्याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अझर अंधा फिरोजचा भाऊ…

अंधा फिरोज हा बटन गोळ्या आणि सिरपच्या बाटल्यांचे रॅकेट चालवणारा असून त्याच्यावर एनडीपीएस चे अनेक गुन्हे दाखल आहेत. जामिनावर बाहेर असताना त्याचा भाऊ सय्यद अझर हादेखील या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

गुजरात कनेक्शन..

एएनटीएफ पथक नशेखोरांविरुद्ध जोरदार कारवाई करू लागले आहे. नशेखोराचे सिंडिकेट उद्धवस्त करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. चांदमारीतून चालणाऱ्या सिंडिकेटचे गुजरात कनेक्शनही समोर आले आहे. हे सिंडिकेट आठवड्याला ५ ते ६ हजार बटन गोळ्या आणि ७०० ते ८०० सिरप बाटल्यांची विक्री करते, असे तपासातून दिसून आले आहे.

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Web Title: Drugs syndicate busted in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Drugs Case

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.