संग्रहित फोटो
ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक राहूल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.
पुणे शहर पोलिस पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत आहेत. यादरम्यान, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सोमवारी (दि. २३ मार्च) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा पोलिस अमलदार मीतेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना कात्रजमधील गंधर्व लान्सजवळ एकजण अग्निशस्त्र बाळगून थांबला असून, तो घातपाताच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्यासह त्यांच्या पथकाने या भागात सापळा रचून लक्ष्मण कचरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून गावठी कट्टा, काडतुस जप्त करण्यात आले. तो घातपाताचा नेमका काय फ्लॅन करत होता किंवा केला होता, यादृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : धर्मांतरासाठी दबाव अन्..; आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पसुरे- कर्नवडी (ता. भोर) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि.२० ) रात्री घडली आहे. पतीने घराला आग लावून पत्नीला आत कोंडून पळ काढला, मात्र सुदैवाने पत्नीने दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडत आपला जीव वाचवला. या भीषण आगीत संपूर्ण घर आणि घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या असून, पोलिसांनी ५० वर्षीय आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.






