Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी; घोटाळ्यातील रक्कम त्यांच्या खात्यात जमा

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झाला त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे ईडीने पीएमएलए कोर्टाला सांगितले.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 05, 2022 | 08:45 AM
वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी; घोटाळ्यातील रक्कम त्यांच्या खात्यात जमा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना काल अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) त्यांचीही चौकशी होणार आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झाला त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे ईडीने पीएमएलए कोर्टाला सांगितले. दरम्यान १ कोटी १७ लाखाच्या व्यवहाराबाबत तपास सुरू असून यापूर्वी १ कोटी ६ लाखांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचे ईडीनं सांगितले. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने समन्स बजावला आहे.

संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रवीण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल (HDIL) ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे. संजय राऊत हेच प्रवीण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असे ईडीने न्यायालयात सांगितले.

Web Title: Ed interrogation of varsha raut today cause scam amount deposited in their account nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2022 | 08:45 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • sanjay raut
  • varsha raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली
1

Sanjay Raut on Bihar Election: ‘१० हजारात लोकशाही विकली जाते…’; बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी तोफ डागली

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका
2

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.