
Goa Mining Scam, Iron Ore Fraud, Goa Mining Fraud Case
Sindhudurg News : गोव्यातील लोहखनिज (Iron Ore) खाणींच्या नावाखाली एका चिनी कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. आरोपींनी चिनी कंपनीकडून उकळलेल्या १३ कोटी ४२ लाख रुपयांचा वापर स्वतःच्या सुखसोयींसाठी आणि सिंधुदुर्गसह मुंबईत मालमत्ता खरेदी करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ‘ईडी’ने जिल्ह्यातील दोन भूखंडांसह मुंबईतील मालमत्तेवर टाच आणली आहे. २.२९ कोटींची मालमत्ता जप्त या कारवाईत ‘ईडी’ने एकूण २ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यात सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील दोन मोक्याचे भूखंड आणि मुंबईतील एक आलिशान फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.
Gram Panchayat Elections: सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; ‘या’ तालुक्यात संख्या जास्त
एका खाण कंपनीने गोव्यातील लोहखनिज खाणींच्या व्यवहाराचे आमिष दाखवून एका चिनी कंपनीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. या आर्थिक फसवणुकीतून मिळालेला पैसा (Proceeds of Crime) मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ‘ईडी’ला होता. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या मनी लाँड्रिंगच्या तपासात सिंधुदुर्गातील हे ‘कनेक्शन’ समोर आले आहे. या मालमत्ता जप्तीमुळे संबंधित खाण कंपनीच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. ‘ईडी’ आता या व्यवहारातील पैशांचा अधिक तपास करत असून, यामध्ये आणखी कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
ईडीने ही कारवाई मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली असून संशयितांनी चिंनी कपंनीची तब्बल १३.२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गोवा आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यानंतर ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली. बँक व्यवहारांच्या तपासातून धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती
खाणीतून लोहखनिज निर्यातीचे स्वप्न दाखवत चिनी कंपनीकडून संबधितांनी गुंतवणूक उभारली होती. त्यानंतर हा पैसा योजनाबद्द पद्धतीने स्वत:च्या फायद्यासाठी वळवण्यात आल्याचे तापासातून निष्पन्न झाले. पण सध्या तरी इडीने याबाबत अद्याप कोणत्याही संशयितांची नावे उघड केलेली नाहीत. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य जमीन व्यवहारांची देखील चौकशी सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
(२०१० पासूनचे प्रकरण) या प्रकरणाची मुळे २०१० सालातील आहेत. संबंधित खाण कंपनीच्या मालकांनी चीनमधील एका नामांकित कंपनीला खाण व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवले होते. “आमच्याकडे खाणींचे मालकी हक्क आहेत आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर लोहखनिज (Iron Ore) निर्यात करू शकतो,” अशा भूलथापा मारून त्यांनी चिनी कंपनीकडून २.९५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १३ कोटी ४२ लाख रुपये उकळले. (Crime news)
RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या
पैशाचे ‘लेयरिंग’ आणि ‘डायव्हर्जन’ चिनी कंपनीने विश्वासाने पैसे वर्ग केले खरे, मात्र प्रत्यक्षात खाणीतून ना उत्खनन झाले ना खनिजाची निर्यात झाली. पण आरोपींनी हे पैसे अतिशय पद्धतशीरपणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून (Layering and Diversion) घेतल्याचे, ‘ईडी’च्या तपासातून असे समोर आले आहे. या पैशातून त्यांनी स्वतःसाठी विलासी सोयीसुविधा आणि मालमत्ता खरेदी केल्या.
सिंधुदुर्ग कनेक्शन आणि मालमत्ता जप्ती या आर्थिक गुन्ह्याची पाळेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहेत. आरोपींनी गुन्ह्यातील पैशातून सिंधुदुर्गातील गाळेल (ता. सावंतवाडी) येथे दोन मोठे भूखंड खरेदी केले होते. तसेच मुंबईत एक आलिशान फ्लॅटही खरेदी केला होता. ‘ईडी’ने या दोन्ही मालमत्तांवर कारवाई करत त्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करून भारतात मालमत्ता गोळा करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात आणखी काही बड्या व्यक्तींचा समावेश आहे का, याचा तपास आता ‘ईडी’ करत आहे.