कंपाउंडमध्ये कचरा जाळताना भयंकर स्फोट, माजी आमदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू (फोटो सौजन्य-ट्विटर)
ईशान्य भारतातल्या मणिपूरमध्ये गेल्या वर्षी 3 मे ला दोन समुदायांमध्ये, कुकी आणि मैतेई, यांच्यात वांशिक संघर्ष सुरू झाला. या संघर्षाची चर्चा वर्षभरापासून देशभरात सतत सुरु आहे. अशातच मणिपूरच्या जातीय हिंसाचारग्रस्त तेंगनौपल जिल्ह्यात अतिरेकी आणि त्याच समुदायाच्या ग्रामीण स्वयंसेवकांमध्ये झालेल्या गोळीबारात चार सशस्त्र पुरुष ठार झाले. तर दुसरीकडे सायकुलचे माजी आमदार यामथोंग हाओकीप यांच्या पत्नीला कांगपोकपी जिल्ह्यात बॉम्बस्फोटात दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शुक्रवारी (9 ऑगस्ट) मोलनोम भागात झालेल्या चकमकीत युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंट (UKLF) चा अतिरेकी आणि त्याच समुदायातील तीन गावातील स्वयंसेवक ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. प्रत्युत्तर म्हणून, स्वयंसेवकांनी यूकेएलएफचे स्वयंघोषित प्रमुख एसएस हाओकिप यांचे घर जाळले. पालेल भागातील खंडणीवर नियंत्रण ठेवणे हे गोळीबाराचे कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा: डॉक्टरवर अत्याचार करुन केली हत्या, मग घरी जाऊन शांत झोपला पण…, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. इम्फाळ खोऱ्यात राहणारा मेईती समुदाय आणि शेजारच्या डोंगराळ भागात राहणारा कुकी समुदाय यांच्यात गेल्या वर्षी मे महिन्यापासून राज्यात सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत.
कांगपोकपी जिल्ह्यातील सायकुलचे माजी आमदार थामथोंग यांच्या पत्नी चारुबाला (५९) या शनिवारी संध्याकाळी घराशेजारी ठेवलेला कचरा जाळला तेव्हा त्याचा स्फोट झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चारुबाला मेईतेई समुदायातील होत्या आणि कुकी जोमिसचे वर्चस्व असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात राहत होत्या. यामथोंग यांनी 2012 आणि 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर दोनदा सायकुल जागा जिंकली होती. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्फोटाच्या वेळी यामथॉन्ग देखील घरीचं होते पण ते थोडक्यात बचावले.