डॉक्टरवर अत्याचार करुन केली हत्या, मग घरी जाऊन शांत झोपला पण..., पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती (फोटो सौजन्य-ट्विटर)
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ आज (12 ऑगस्ट) निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप पुकारला आहे. दिल्लीतील एम्ससह अनेक सरकारी रुग्णालयांचे निवासी डॉक्टर संपावर आहेत. ओपीडी, ओटी आणि वॉर्ड सेवा ठप्प आहेत. दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, कलावती हॉस्पिटल, सुचेता कृपलानी, सफदरजंग हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक हॉस्पिटल, जीबी पंत, दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये ओपीडी सेवा, वैकल्पिक शस्त्रक्रिया आणि प्रयोगशाळा सेवा बंद आहेत. परिणामी रुग्णांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीसंदर्भात जी माहिती दिली त्याने आता सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे.
हे सुद्धा वाचा: डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले
पश्चिम बंगालमधील कोलकाता सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. आरोपीने चौकशीकर्त्यांना सांगितले की, महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्यानंतर तो घरी जाऊन शांतपणे झोपला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने पहिले कपडे धुतले.
गुन्हेगार म्हणजे त्याने आपला गुन्हा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला, कितीही पुरावे मिळाले तरी तो पकडला जातो. तीच गोष्ट संजय रॉय सोबत झाली. त्याने आपल्या कपड्यांवरील सर्व रक्ताचे डाग धुऊन टाकले, पण एक डाग राहिला आणि तो डाग त्याला भारी पडला. पोलिसांना त्याच्या बुटांवर रक्ताच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी या खुणा पुरावा म्हणून जप्त केल्या.
हे सुद्धा वाचा: निवासी डॉक्टरांचा आज देशव्यापी संप; महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी नोंदवणार निषेध
देशात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ.संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा देताना ते म्हणाले, सोशल मीडियावर माझी बदनामी केली जात आहे. मृत डॉक्टर माझ्या मुलीप्रमाणे होती. पालक म्हणून मी राजीनामा देत आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना कोणाशीही घडणे मला आवडणार नाही.
या आंदोलनाचा थेट परिणाम ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर होत आहे. आजपासून निवासी डॉक्टर आपत्कालीन विभागाशिवाय कोणत्याही विभागात काम करणार नाहीत. आरएमएलमध्ये सध्या 1500 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. निवासी डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्षही यावेळी आरोग्य सचिवांसोबत बैठक घेत आहेत.