बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकून वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील तालवाडा येथील तहत रामनगर येथे घडली आहे.
Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार अमोल हौसराव सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी आपल्याच चार महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून जीवे मारले. त्यांनतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वीच दोघा पती-पत्नीत कौटुंबिक वाद झाला होता. यातूनच अमोल सोनवणे याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान, बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळत आहे. सतत मारहाण, हत्या, अश्या अनेक घटना समोर येत आहे. पोलीस प्रशाशन गुन्हेगारीला आलं घालण्यासाठी काय करत आहे असा प्रश्न उपस्थतीत केला जात आहे. दरम्यान वरील घटनेचा तपास पोलीस करत असून घटनेने खळबळ उडाली आहे.
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भर रस्त्यावर मित्रानेच घेतला मित्राचा जीव
बीडमधून पुन्हा एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाची भररस्त्यावर चाकू भोसकून हत्या करण्यात आली. यश ढाका असे मृतकाचे नाव आहे. त्याचे वडील देवेंद्र ढाका (वय 45 वर्षे रा. बलभीम नगर पेठ बीड) हे पत्रकार आहे. आता या घटनेने सुव्यवरथेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हि हत्या बीड येथील माने कॉम्पलक्स परिसरात करण्यात आली आहे. मित्राने बाचाबाचीत चूकीने छातीत सपासप वार करून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या यश ढाका याच्या वडिलांनी बीड ययेथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
देवेंद्र ढाका यांच्या तक्रारीनुसार बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एकूण पाच आरोपींवर 302अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे, एका आरोपीला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. मात्र यातील आणखी चार आरोपी अद्याप ही फरार आहेत. या फरार आरोपींना ताब्यात घेण्यात यावे या करिता नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर भर पावसात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन ही केले होते. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यशच्या मारेकऱ्यांना शोधून अटक करू असे आश्वासन देखील दिले. यशच्या पश्चात त्याचा लहान भाऊ आई, वडील असा परिवार आहे.