छत्तीसगड: छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पत्नीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पती पत्नीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरु होते. एके दिवशी हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात पत्नीने पतीची हत्या केली. हातोडीने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि तो ट्रॉली बॅगेत लपवून ठेवला. एवढेच नाही तर, तिने आपल्या मुलीला फोन करून हा घडलेला प्रकार सांगितले. आरोपी महिलेचे नाव मंगरीता असे आहे तर मृतकाचे नाव संतोष भगत (43) असे आहे.
काय घडलं नेमकं?
आरोपी मंगरीता ही मुंबईमध्ये काम करत होती आणि काही दिवसांपूर्वीच ती गावी आली होती. आरोपी मंगरीता आणि मृतक संतोष यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरु होते. हा वाद इतका वाढला की मंगरिता हिने रागाच्या भरात आपल्या पती संतोषची हत्या केली. हातोडीने संतोषवर वार करून त्याची हत्या केली. हत्येनंतर, आरोपी महिलेने मृतदेह लपवण्यासाठी एक योजना आखली. महिलेने पतीचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि तो लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत भरून घरात लवपून ठेवला. त्यांनतर तिने आरोपी पत्नीने तिच्या विवाहित मुलीला फोन करून तिच्या कृत्याबद्दल सांगितलं. फोनवर आपल्या मुलीला ती म्हणाली की, मी तुझ्या वडिलांची हत्या केली आहे आणि मृतदेह सूटकेसमध्ये भरून तो घरात लपवून ठेवला आहे. आईचं बोलणं ऐकून मुलगी अतिशय घाबरली. ती लगेच तिच्या पतीसोबत गावी पोहोचली आणि तिने तिच्या काकांना घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर, काकाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराची झडती घेतली. तपासादरम्यान, त्यांना घरात एक ट्रॉली बॅग सापडली. ती बॅग उघडल्यानंतर, त्यात संतोषचा मृतदेह चादरीत गुंडाळला होता आणि चेहऱ्यावर तसेच हातावर रक्ताचे डाग होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलीस तपास सुरू
पतीच्या हत्येनंतर, ती पुन्हा मुंबईला निघून गेली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृताच्या भावाने नोंदवलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीविरुद्ध भारतीय दंड संहिता 302 (हत्या) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता, आरोपीच्या शोधात पोलिसांचं पथक मुंबईला पोहोचलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Ans: हातोडा
Ans: मंगरीता
Ans: जशपुर






