
अमरावतीमध्ये बनावट कागदपत्रांतून बँकेला ८२ लाखांचा गंडा
दोन स्वतंत्र गुन्ह्यांत आठ जणांविरुद्ध कारवाई
गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
अमरावती: इंडियन बँकेकडे बनावट व खोटे दस्तऐवज सादर करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलत आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही प्रकरणांत एकूण ८२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अमरावतीमधील गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात ४४ लाख तर दुसऱ्या प्रकरणात ३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींनी संगनमताने कटकारस्थान रचत बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून कर्ज उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीविरुध्द गंभीर आहेत. दोन्ही प्रकरणांत काही आरोपी समान असल्याने फसवणुकीचे किट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. कर्जाची रक्कम कुठे वापरण्यात आली, याचा तपास सुरू आहे.
दुसऱ्या प्रकरणात ३८ लाखांची फसवणूक
इंडियन बँकेची ३८ लाख रुपयांची फसवणूकप्रकरणी दुसरा तंत्र गुन्हা বাক करण्यात आला आहे. फिर्यादी रविकुमार दिनेशचंद्र मंडल (४१, रा. भटकर, ता.को राज बिहार, ह. मु. गणेश कॉलनी, अमरावती यांनी दिली आहे. संजय दुर्योधन धंदा, एक महिला आरोपी (दोन रा. गणोरी, जतखरे (रा. अंजनगाव बारी, बडनेरा) व एस. डी. मोहोड (रा. गणेश कॉलनी, दर्यापूर) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल
बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद
अमरावती-बडनेरा मार्मावरील सातुर्गा परिसरात सुरू असलेल्या जमीन वादाने आता गुन्हेगारी वळण घेतले आहे. बांधकाम साहित्य चोरी, धमकी व अतिक्रमणाच्या आरोपांमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी प्रसिद्ध व्यावसायिक विष्णु प्रसाद व्यास, त्यांचा मुलगा ध्रुव आास व एका अन्य व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हरीश आडवाणी (३२. रा. नवजीवन कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी व त्यांचे वडील हरीश आडवाणी यांनी सातुर्गा परिसरात सर्वे क्रमांक-१७/२/मधीला २० आर जमीन कायदेशीररित्या खरेदी केली आहे.