Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Fertilizer Racket: संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

Fake Fertilizer Racket News: छत्रपती संभाजीनगरमधील वंजारवाडी येथे बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश. २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट खत विकले जात होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 04, 2026 | 02:52 PM
Fake Fertilizer Racket (Photo Credit- X)

Fake Fertilizer Racket (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश
  • २६ लाखांचा साठा जप्त
  • नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट खत रॅकेटचा मोठा पर्दाफाश दौलताबाद पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत झाला. वंजारवाडी येथील गोडाऊनमध्ये नामांकित कंपन्यांच्या छापील रिकाम्या बॅगमध्ये संशयित खत भरून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत २६ लाख ६२ हजार ७६२ रुपयांचा ११८.७४ मेट्रिक टन खतसाठा, हजारो रिकाम्या बॅगा, पॅकिंग मशिन व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी अनिल बालाप्रसाद मंत्री (रा. नांदेड वाघाळा), सचिन मारोती निंफळ (रा. वाळूज), बालाजी फॉस्फेट लि. आणि गणेश कृषी उद्योग यांच्याविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खत निरीक्षक गोविंद पौळ यांच्या फिर्यादीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री कृषी विभाग व पोलिसांनी वंजारवाडीतील गोडाऊनवर धाड टाकली. गोडाऊन बंद असल्याने मागील बाजूस तपासणी केली असता तीन मजूर आढळले. गोडाऊन उघडल्यावर मोठ्या प्रमाणात संशयित खतसाठा व रिकाम्या बॅगा सापडल्या. पथकाला आयएफएफसीओ, पारादीप, इंडियन पोटॅश, कोरोमंडल, आरसीएफ आदी कंपन्यांच्या हजारो रिकाम्या बॅगा आढळल्या. तसेच लेबलविरहित पांढऱ्या बॅगमध्ये संशयित खत, व्हाईट पावडर, मॅग्नेशियम सल्फेट व मोनो अमोनियम फॉस्फेटसदृश साहित्य आढळले. बॅग शिवण्याची मशिन, दोरे व पॅकिंग साहित्यही जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान एक ट्रक (एमएच-२८ बीबी-७८७८) गोडाऊनमध्ये आला. त्यामध्ये ७०० बॅग एसएसपी खत आढळले. कागदपत्रांनुसार हे खत गणेश कृषी उद्योगासाठी असल्याचे नमूद होते; मात्र संबंधितांनी अशी मागणी नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बनावट कागदपत्रांद्वारे खत पुरवठा सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार! पालकमंत्र्यांच्या हस्ते आधुनिक कचरा संकलन व्यवस्थेचा शुभारंभ

मजुरांनी चौकशीत सचिन निंफळ यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे सांगितले. निंफळ यांनी गोडाऊन भाड्याने घेतल्याची कबुली दिली. तसेच नांदेड येथील व्यंकटेश कृषी भांडारचे मालक अनिल मंत्री यांच्या सांगण्यावरून विविध कंपन्यांच्या बॅगमध्ये खत भरून पॅकिंग केले जात असल्याचेही समोर आले. प्राथमिक तपासात परवाना नसताना खत साठवण, पॅकिंग आणि बनावट खत निर्मिती सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात बनावट खत पुरवठ्याचे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करत आहेत.

हजारो बॅगा अन् खत, मशिनरी केल्या जप्त

कारवाईत १४ हजार ३५५ रिकाम्या छापील खतबॅगा जप्त करण्यात आल्या. यामध्ये डीएपी, एनपीके, युरिया व एमओपी बॅगचा समावेश आहे. तसेच ३२० बेंग ग्रॅन्युलर खत, ५५३ बेंग पांढरी पावडर, ७०० बैंग एसएसपी खत, युरिया खत, शिवण मशिन व पेंकिंग साहित्यही हस्तगत करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई; १५ वर्षांपासूनची अवैध ‘शहानुरमिया दर्गा चौपाटी’ भुईसपाट

Web Title: Fake fertilizer racket busted in chhatrapati sambhajinagar 26 lakh stock seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.