Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडोल गावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक करण्याची कुटुंबियांची मागणी

अंबरनाथ पश्चिमच्या वडोल गाव परिसरात एका 23 वर्षीय तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याला 2 दिवस उलटले तरिही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी तरूणाच्या कुटूंबियांनी पोलिसांकडे केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2024 | 01:34 PM
वडोल गावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला (फोटो सौजन्य- सोशल मिडीया)

वडोल गावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला (फोटो सौजन्य- सोशल मिडीया)

Follow Us
Follow Us:

अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जुन्या वादातून तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथ पश्चिमेच्या वडोल गाव परिसरात घडली आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सौरव म्हात्रे (वय २३) असं हल्ला झालेल्या तरूणाचं नाव आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्याला 2 दिवस उलटले तरिही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तरूणाच्या कुटूंबियांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी कुटूंबियांकडून केली जात आहे.

हेदेखील वाचा- 30 रुपये रिक्षाच्या भाड्यावरून झाला वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट

रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या वडोल गाव परिसरात सौरव म्हात्रे (वय २३) या तरुणावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी सौरभच्या खांद्यावर आरोपीने धारदार चाकू खूपसला असल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सौरभच्या खांद्यामध्ये चाकू अडकला होता. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा खांद्यामध्ये अडकलेला चाकू बाहेर काढला. सध्या सौरभवर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सौरभवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रोहन जाधव उर्फ वाघ्या (२०) या तरुणावर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्याला 2 दिवस उलटले तरिही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तरूणाच्या कुटूंबियांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी सौरभच्या कुटूंबियांनी पोलिसांकडे केली आहे.

हेदेखील वाचा- नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर रेल्वे स्टेशनवरील घटना

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितलं की, अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या वडोल गाव परिसरातील सौरव म्हात्रे या तरुणावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यावेळी सौरभच्या खांद्यावर आरोपीने धारदार चाकू खूपसला. या घटनेत सौरव म्हात्रे गंभीर जखमी झाला. चाकू शरीरात अडकलेल्या अवस्थेत सौरभला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रोहन जाधव उर्फ वाघ्या (२०) या तरुणावर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

Web Title: Fatal attack on youth over old dispute in vadol village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 01:29 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
3

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
4

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.