30 रुपये रिक्षाच्या भाड्यावरून मित्रानेच केली मित्राची हत्या (फोटो सौजन्य - istock)
मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन मित्रांमध्ये रिक्षाचे भाडे देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात काल 12 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 29 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेदेखील वाचा- नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर रेल्वे स्टेशनवरील घटना
छक्कन अली (वय 28) आणि सैफ जाहिद अली (वय 29) हे दोन्ही मित्र उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघेही अगदी जवळचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी हे दोघं कामानिमित्त मुंबईत आले होते. दोघेही कपड्याच्या कारखान्यात काम करायचे. रविवारी रात्री ह्या दोघांमध्ये कुर्ला येथे ऑटोरिक्षाचे 30 रुपये भाडे देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका चिघळला की जाहिदने छक्कनची हत्या केली. ही संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छक्कनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला.
याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ जाहिद अली आणि छक्कन हे दोघेही उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्यात घट्ट मैत्री होती. हे दोघेही नुकतेच मुंबईत आले होते. ते मुंबईतील एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होते. काल रात्रीच्या सुमारास ह्या दोन्ही मित्रांमध्ये रिक्षाचे भाडे देण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद वाढत गेल्याने जाहिदने छक्कनची हत्या केली. त्यानंतर छक्कनला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून जाहिदने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी छक्कनला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हेदेखील वाचा- घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या याचिकेवर उद्या मुंबई हाय कोर्टात सुनावणी
पोलिसांना छक्कनच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या, तेव्हा त्यांना संशय आला आणि त्यांनी चौकशी सुरू केली. मुंबई क्राइम ब्रँचचे युनिट 5 देखील त्याच्या तपासात गुंतले. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने घटनास्थळावर बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावरून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास छक्कन आणि सैफ जाहिद अली यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलं. 30 रुपयांच्या रिक्षाच्या भाड्यावरून सैफ आणि छक्कन यांच्यात वाद झाला, यादरम्यान सैफने छक्कनला मारहाण केली आणि ढकलले, त्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर लगेचच आरोपी सैफ घटनास्थळावरून पळून दादर रेल्वे स्थानकावर गेला. तेथून त्याने कल्याण रेल्वे स्थानक गाठले. गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पोलिसांनी आरोपी सैफला कल्याणहून गोरखपूर एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशातील गोंडा येथे जात असताना अटक केली. मुंबई क्राईम ब्रँचने आरोपीला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक करून कुर्ला पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.