स्टंट करणं बाईकर्सना पडलं भारी, मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड (फोटो सौजन्य - pinterest)
आतापर्यंत आपण अशा अनेक घटना पाहिल्या आणि ऐकल्या असतील, ज्यामध्ये स्टंट केल्याप्रकरणी बाईक चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. रिल्स आणि व्हिडीओ बनवण्याच्या नादात सध्याची तरूण मंडळी बाईकवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करतात. या घटनांमुळे तरूणांसोबतच रस्त्यावरील इतर वाहन चालकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो. रिल्स आणि व्हिडीओ तयार करण्यासाठी केले जाणारे हे धोकादायक स्टंट तरूणांच्या जीवावर बेतण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्न करत असतात.
हेदेखील वाचा- 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक; वाशिमच्या मंगरुळपीर येथील घटना
सध्या अशीच एक घटना मुंबईत देखील घडली आहे. मुंबईत बेधडक दुचाकीस्वार अनेकदा जीवघेणे स्टंट करताना दिसतात. दुचाकीस्वार आपला जीव तसेच इतरांचा जीव धोक्यात घालतात. मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन रोडवर अनेक दुचाकीस्वार जमा झाले आणि त्यांनी जीवघेणे स्टंट करण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी ही सर्व घटना घडली. या संपूर्ण घटनेचा आणि बाईक चालकांच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या बाईक चालकांना अटक करून दंड ठोठावला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा वेगात बाइक चालवत जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. हा बाईक चालक त्याची गाडी दुभाजकाच्या जवळ ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तर त्याच्या मागे बसलेला तरूण ह्याचा व्हिडीओ बनवत आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून एका दुचाकीस्वारालाही अटक केली आहे. ह्या घटनांमुळे बाईकचालक स्वत:सोबतच इतर वाहन चालकांचा जीव देखील धोक्यात घालतात.
हेदेखील वाचा- नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर रेल्वे स्टेशनवरील घटना
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन रोडवर अनेक बाईक चालक जमा झाले होते आणि त्यांनी एकामागून एक जीवघेणे स्टंट करण्यास सुरुवात केली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री उशिराचा मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन रोडवरील हा व्हिडीओ आहे. वांद्रे रेक्लेमेशन मार्गावर अनेक बाईक चालक जमले आणि एकामागून एक धोकादायक स्टंट करू लागले.
पोलिसांनी पुढे सांगितलं की, व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा वेगात बाइक चालवत जीवघेणा स्टंट करत आहे. तो त्याची दुचाकी दुभाजकाच्या जवळ ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, तर बाईकच्या मागे बसलेला दुसरा एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे. हे बाईक चालक अनेकदा शनिवारी आणि रविवारी रात्री उशिरा येऊन शहरातील विविध भागात दुचाकी स्टंट करत असल्याचे सांगितलं जात आहे. घटनास्थळावरून एका दुचाकीस्वारालाही अटक करण्यात आली आहे.
सर्व दुचाकीस्वार एक गट तयार करतात आणि संपूर्ण परिसरात गोंधळ घालतात आणि नंतर पळून जातात. ते त्यांच्या स्टंटचे व्हिडिओही बनवतात. यामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी असे स्टंट करताना अनेक अपघात झाले आहेत. यापूर्वीही धोकादायक स्टंट करणाऱ्या या दुचाकीस्वारांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, मात्र तरीही हे लोक त्यांच्या कृत्यापासून परावृत्त होत नाहीत. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचताच सर्व बाईक चालक पळून गेले, तर एकाला पकडण्यात आले.