Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दु:खद! विरुद्ध दिशेने कंटेनर आला अन् बाप-लेकाला थेट…; कुठे घडला धक्कादायक अपघात?

Indapur Accident: विरूध्द दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने  वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला समोरून धडक दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 06:34 PM
दु:खद! विरुद्ध दिशेने कंटेनर आला अन् बाप-लेकाला थेट…; कुठे घडला धक्कादायक अपघात?
Follow Us
Close
Follow Us:
कंटेनरच्या धडकेत बाप – लेकाचा दुर्दैवी मृत्यू
पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ येथील अपघात
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला अपघात 

पाटस: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथील फुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर गाडीने समोरील दुचाकी चालकाला उडवले. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.  खंडु नारायण बनसुडे (वय ३५)व रूद्र खंडु बनसुडे (वय  दोघेही  रा. पळसदेव ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी ( दि. २)पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ  हद्दीत चँनेल नं ७४+२०० चे ब्रिझ जवळ सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  खंडु नारायण बनसुडे हे दुचाकीवरून मुलगा रूद्र याच्यासह  जात असताना कुरकुंभ ब्रीजवर विरूध्द (चुकीच्या) दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने  वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला समोरून धडक दिली. या अपघात दोघांना  डोक्याला,हाता-पायाला गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ह्या अपघातात  मोटर सायकलचा चेंदामेंदा झाल्याने नुकसान झाले आहे. या अपघातानंतर कंटेनर वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला. त्याबाबत दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हरमाडा भागात अनियंत्रित डंपरने रस्त्यावर मृत्यूतांडव केले आहे.डंपर चालकाने अनेकांना उडवल्याची घटना घडली आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते आहे. पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

डंपर रस्त्यावर अनियंत्रित झाल्याने त्याने अनेकांना उडवले आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सर्वात पहिल्यांदा डंपरने एका कारला धडक दिली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ…; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू

डंपरने अनेक जणांना चिरडले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी नागरिकांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

 

Web Title: Father and son die hit by container travelling in opposite direction at high speed kurkumbh indapur accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 06:31 PM

Topics:  

  • Accident
  • crime news
  • Indapur Crime

संबंधित बातम्या

खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…
1

खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…
2

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!
3

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
4

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.