जयपूरमध्ये भीषण अपघात (फोटो- ट्विटर)
राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण अपघात
मद्यधुंद अवस्थेत डंपरने अनेकांना उडवले
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ
Jaipur Dumper Accident: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हरमाडा भागात अनियंत्रित डंपरने रस्त्यावर मृत्यूतांडव केले आहे. डंपर चालकाने अनेकांना ठोकले आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते आहे.
डंपर रस्त्यावर अनियंत्रित झाल्याने त्याने अनेकांना उडवले आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सर्वात पहिल्यांदा डंपरने एका कारला धडक दिली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
जयपुर में यमराज बनकर सड़क पर उतरा डंपर! 60 से ज्यादा लोगों को रौंदा, 19 की हुई मौत इस CCTV वीडियो को देखकर कांप जाएगी रूह#JaipurNews #Rajasthan #RoadAccident pic.twitter.com/0ADkFT7MNV — अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) November 3, 2025
डंपरने अनेक जणांना चिरडले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी नागरिकांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
तेलंगणामध्ये भीषण अपघात
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली. 70 हून अधिक प्रवासी असलेल्या बसची ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. तर जखमींची संख्या 12 हून अधिक आहे. या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचाही मृत्यू झाला आहे. हैदराबाद-विजापूर महामार्गावर चेवेल्ला मंडलमधील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोहून येणारी आरटीसी बस थेट खडी भरलेल्या टिप्पर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. बस आणि टिप्पर ट्रकची धडक इतकी भीषण होती की, टिप्पर ट्रकमधील खडी बसमध्ये पडली आणि अनेक प्रवासी अडकले. टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते.
या धडकेमुळे बसमध्ये गोंधळ उडाला आणि अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढून चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक निर्देश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य कोणत्याही परिस्थितीत जलदगतीने पूर्ण केले पाहिजे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार दिले पाहिजेत.






