Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्…

१६ मार्च रोजी आरोपीने पत्नीला मुलाला होस्टेलला सोडायला जातो, असे सांगून सिद्धार्थला घरातून नेले. मात्र, उंब्रज परिसरात आणून त्याने निर्दयपणे मुलाला नदीत फेकून खून केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2026 | 08:21 AM
बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्...

बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्...

Follow Us
Follow Us:

उंब्रज : वडोली भिकेश्वर (ता. कराड) येथील कृष्णा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या चिमुकल्याच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला असून, जन्मदात्या बापानेच आपल्या ६ वर्षीय मुलाचा निर्दयीपणे खून केल्याचे समोर आले आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरेकेरी (वय ६) असे मृत मुलाचे नाव असून, आरोपी वडील मल्लिकार्जुन आरेकेरी (रा. नागठाण, ता. विजापूर, कर्नाटक) यानेच मुलाला कृष्णा नदीत फेकून ठार मारल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी आरोपीने पत्नीला मुलाला होस्टेलला सोडायला जातो, असे सांगून सिद्धार्थला घरातून नेले. मात्र, उंब्रज परिसरात आणून त्याने निर्दयपणे मुलाला नदीत फेकून खून केला. आरोपी यापूर्वी वडोली भिकेश्वर परिसरात वाळू उपसा कामासाठी येत असल्याने त्याला हा निर्जन भाग चांगलाच परिचित होता.

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

या निर्दयी कृत्यापूर्वी मुलाला नवीन कपडे घालून त्याला नदीपात्रात टाकल्याची बाब समोर आली आहे. खून करून आरोपी शांतपणे घरी परतला. दरम्यान, १ एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस असल्याने आई भाग्यश्री हिने मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्याने संशय वाढला. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

दुसरीकडे, १८ मार्च रोजी मसूर पोलिसांना वडोली भिकेश्वर हद्दीत कृष्णा नदीत सदर मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांना फोटो पाठवून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. याच धाग्यावरून कर्नाटक पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली आणि अखेर या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवले.

शनिवारी सायंकाळी कर्नाटक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून पंचनामा केला. त्यावेळी मसूर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, प्रदीप पाटील, अमोल पवार, एस. सी. लावंड यांनी तपासात मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, स्वतःच्या पोटच्या मुलाचा जीव घेण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपासात याचा उलगडा होणार आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Father brutally murders his 6 year old child incident umbraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • crime news
  • Satara News

संबंधित बातम्या

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
1

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
2

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.