Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसताना तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून उपचार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2026 | 02:52 PM
पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसताना तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून उपचार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भेकराईनगर परिसरात हा प्रकार समोर आला आहे. शहजाद इक्बाल मोहम्मद खान ऊर्फ राज पटेल (रा. खटीक मोहल्ला, सांगोद, कोटा, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. राजेश महादेव पाखरे (वय ४९, रा. मांजरी, पुणे-सोलापूर महामार्ग) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पटेल याच्याकडे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी किंवा प्रशिक्षण नसल्याचा आरोप आहे. असे असतानाही तो भेकराईनगर येथील एस. पी. रेसिडेन्सी परिसरात ‘राज पटेल नेचरोपॅथी केअर’ या नावाने उपचार करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक पात्रता नसलेल्या व्यक्तीकडून उपचार केले गेल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आर्थिक फायद्यासाठी आरोपीकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागाकडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर फुरसुंगी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा  : ‘5-50 कोटी दिले असतील, मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या देतील, पण…’; संजय राऊतांचा ओमराजेंवर हल्लाबोल

दरम्यान, आरोपीने आतापर्यंत किती रुग्णांवर उपचार केले, उपचारादरम्यान कोणती औषधे किंवा साहित्य वापरले, तसेच या माध्यमातून किती आर्थिक व्यवहार झाला, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. आरोपीकडे वैद्यकीय उपचारांसाठी वापरले जाणारे साहित्य किंवा औषधांचा साठा होता का, याचाही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील पुढील तपास फुरसुंगी पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : २०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

Web Title: The fursungi police have registered a case against a bogus doctor nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
1

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
2

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
3

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
4

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.