Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

आक्रमक भाषेत उत्तर देणारा नेता म्हणून ओळखला जाणारा, ठाकरेंच्या शिवसेनेचा उपनेता शरद विठ्ठल कोळी (वय ३७ . अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2026 | 11:33 AM
ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाला मोठा धक्का!
  • शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई
  • थेट येरवडा कारागृहात रवानगी
शिवाजी हळणवर/पंढरपूर : सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षावर टीका झाल्यानंतर त्यांना आक्रमक भाषेत उत्तर देणारा नेता म्हणून ओळखला जाणारा, ठाकरेंच्या शिवसेनेचा उपनेता शरद विठ्ठल कोळी (वय ३७ . अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई केली आहे. शरद कोळी याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक आणि इतर विघातक कृत्यांना आळा घालणाऱ्या ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार शरद कोळीला एका वर्षाकरिता पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात  स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 

पंढरपुरात वैद्यकीय तपासणीनंतर येरवड्याकडे रवानगी

काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात फरार असताना शरद कोळी याला सांगली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेश क्रमांक २०२६/डी.सी.बी/२/आरआर/४७६१(१)/२०२६ (दिनांक १७/०९/२०२६) अन्वये ही स्थानबद्धतेची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात शरद कोळीची रीतसर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 ‘या’ गंभीर गुन्ह्यांमुळे झाली कारवाई

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद कोळी याच्यावर सोलापूर आणि आसपासच्या परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवलेले आहेत. वाळू चोरी आणि तस्करी व्यापाऱ्यांकडे आणि नागरिकांकडे खंडणी मागणे. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. या सर्व विघातक कृत्यांची गंभीर दखल घेत ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजारे, बेकायदेशीर सावकार बेकायदेशीर लॉटरी चालवणारे आणि मानवी अपहरण करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१’ (सुधारणा १९९६, २००९, २०१५ व २०२५) च्या कलम ३(१) प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि सहाय्य पोलीस अधीक्षक  प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जिल्लावार यांनी ही कारवाई केली आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर अशा प्रकारे थेट १ वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title: Major action has been taken against sharad koli of uddhav thackerays shiv sena nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sharad Koli

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
1

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
2

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
3

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
4

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.