कुऱ्हाडीने डोक्यावर केले वार सासऱ्याने केली सुनेची हत्या(संग्रहित फोटो)
नागपूर : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने सुनेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. हत्येनंतर सासऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला वेळीच बाहेर काढल्याने जीव वाचला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिवळी नदी परिसरात शनिवारी सकाळी घडली.
लक्ष्मी रविशंकर पाली (वय ४०, रा. पाहुणे ले-आऊट, हनुमान मंदिराजवळ, पिवळी नदी) असे मृताचे तर नत्त्थूलाल पाली असे अटकेतील आरोपी सासऱ्याचे नाव आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी यांचे पती रविशंकर यांचे २०१९ मध्ये निधन झाले. मुलावर जादूटोणा केल्याचा संशय घेत नत्थुत्लाल यांचा सुनेसोबत वारंवार वाद होत होता. त्यामुळे लक्ष्मी २१ वर्षीय मुलगी आणि १९ वर्षीय मुलासह एकाच घरात वेगळ्या राहात होत्या.
सांगण्यात येते की, नत्थूलाल भांडणादरम्यान सुनेला अश्लील शिविगाळ करत आणि जिवे मारण्याची धमकी देत अंगावरही धावून जात होता. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळीही दोघांमध्ये वाद झाला. बराच वेळपर्यंत दोघांमध्ये खदखद सुरू होती. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लक्ष्मी घरात कपडे धूत असताना नत्त्थूलाल मागून आला आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. गंभीर जखमी झाल्याने लक्ष्मी जागीच कोसळल्या.
विहिरीत घेतली उडी
यशोधरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख चांद पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हत्येनंतर नत्थूलालने जवळील विहिरीत उडी घेतली. नागरिकांनी त्याला बाहेर काढले. पोलिसांनी त्याला तातडीने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रुग्णालयात दाखल केले. यशोधरानगर तपास सुरू केला आहे.






