Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

इन्स्टाग्रामवरून सुरू झालेली ओळख, सिनेमातील रोलचे आमिष आणि ऑडिशनच्या नावाखाली वाढलेला संपर्क... खासगी फोटो घेतल्यानंतर अचानक सुरू झाल्या धमक्या; त्यानंतर तरुणीने घेतलेल्या एका निर्णयाने संपूर्ण प्रकरण समोर आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 27, 2026 | 01:36 PM
Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्...

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्...

Follow Us
Follow Us:
  • सिनेमातील रोलचे आमिष दाखवून इन्स्टाग्रामवरून ओळख
  • ऑडिशनच्या नावाखाली खासगी फोटो घेतल्याचा आरोप
  • धमकीनंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
 

धाराशिव: चित्रपटात काम मिळवून देण्याचे तसेच बॉलिवूडमध्ये करिअर घडवून देण्याचे आमिष दाखवत २० वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या व्यक्तीने आपण चित्रपटसृष्टीतील गायक असल्याचे सांगत अभिनयाची संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. ऑडिशनच्या नावाखाली खासगी छायाचित्रे घेऊन त्याचा गैरवापर करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी प्रकरण धाराशिवमधील आनंदनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

इन्स्टाग्रामवरून झाली ओळख

तक्रारीनुसार, धाराशिव येथील तरुणीची ऑगस्ट महिन्यात कांदिवली येथील जतीन दोशी याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. दोशीने आपण चित्रपटसृष्टीतील गायक असल्याचे सांगत तिला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला. यानंतर दोशीने व्हिडिओ कॉलद्वारे तिचे ऑडिशन घेतले. चित्रपटातील भूमिकेसाठी विशिष्ट प्रकारचा लूक आवश्यक असल्याचे सांगत त्याने तिला खासगी छायाचित्रे पाठविण्यास सांगितल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या छायाचित्रांचा पुढे गैरवापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे.

हेही वाचा:पावसाने पुन्हा घेतली उघडीप; राज्यात मोठ्या पावसाचा इशारा नाही, काही भागांत मेघगर्जनेसह सरींची शक्यता

बोरिवलीत बोलावून हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप

१६ सप्टेंबर रोजी दोशीने तरुणीला बोरिवली येथे बोलावले. त्यानंतर तिच्या आधारकार्डमधील तपशीलात बदल करून तिला नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप आहे. तेथे आधी घेतलेल्या छायाचित्रांचा प्रसार करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर तिला आणखी तीन पुरुषांना भेटण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र, तरुणीने त्यास नकार दिला आणि ती धाराशिवला परतली. त्यानंतर या प्रकरणातील काही व्यक्तींकडून तिला धमक्या मिळाल्याचा आरोप करण्यात आला.

धमक्यांनंतर पोलिसांत धाव

जतीन दोशी आणि आनंद मुदलियार यांच्याकडून धमक्या मिळाल्याचे सांगत तरुणीने नायगाव पोलिसांशी संपर्क साधला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाची नोंद घेत तपास सुरू केला. सोशल मीडिया संपर्क, फोनवरील संभाषण, ऑडिशनच्या नावाखाली झालेला संपर्क आणि संबंधित ठिकाणांबाबत माहिती गोळा केली जात आहे.

हेही वाचा: वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर, सीसीटीव्ही फुटेज पोलिसा

चौघांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी जतीन दोशी, मिनाज रहमान, आनंद मुदलियार आणि ऋषभ दोशी यांच्याविरुद्ध बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण पुढील तपासासाठी धाराशिव येथील आनंदनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यासह संबंधित व्यक्तींची भूमिका, डिजिटल पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील नेमका घटनाक्रम आणि प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पीडित तरुणीची ओळख उघड होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे.

Web Title: Film role instagram woman assault case dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Dharashiv Crime
  • Dharashiv News
  • film news
  • Instagram News
  • scam

संबंधित बातम्या

Vasai Virar Scam : 25 वर्षे सेवा करणारे बाजूला अन् कंत्राटी अधिकारी थेट वरिष्ठ पदावर! पालिकेच्या निर्णयाने कर्मचारी आक्रमक
1

Vasai Virar Scam : 25 वर्षे सेवा करणारे बाजूला अन् कंत्राटी अधिकारी थेट वरिष्ठ पदावर! पालिकेच्या निर्णयाने कर्मचारी आक्रमक

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा
2

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा

Hollywood News :वॉर्नर ब्रदर्स’ डीलला मोठा ट्विस्ट! पॅरामाउंटचा 12 अमेरिकन राज्यांशी करार
3

Hollywood News :वॉर्नर ब्रदर्स’ डीलला मोठा ट्विस्ट! पॅरामाउंटचा 12 अमेरिकन राज्यांशी करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.