! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
पंढरपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं लवअफेअरसाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. ही हत्या एक्दम फिल्मी स्टाईल ने करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सस्पेन्स हत्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नेमकं प्रकरण काय?
पंढरपूर हादरलं! आई आणि मुलाची राहत्या घरात निर्घृण हत्या, कारण अद्याप अस्पष्ट
पंढरपूर येथे मंगळवेढ्यात एक फिल्मी स्टाईल हत्येने खळबळ उडाली आहे. मंगळवेढ्यातील पाटकळ मध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. घरासमोरील गवताच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. त्यामुळे घरातील विवाहित सुनेनेच आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटले. सुनेचे नाव २३ वर्षीय किरण सावंत आहे. यांनतर किरणचे माहेरकडील कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले आहे. त्यांना आपल्या मुलीची आत्महत्यानसून हत्या असल्याचा संशय येऊ लागला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेत हत्या असल्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी किरणचा फोन तिच्या अंगावर जळालेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. या फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला.
पोलिसांनी तातडीने संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौसकाशी सुरु केली. तेव्हा त्याने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जातांना त्याने पुन्हा घटनेची सविस्तर खरी कबुली दिली. त्याने सांगितले ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे असे सांगितल्याने पोलिसही चकित झाले. यानंतर पोलिसांनी त्याला त्या विवाहितेला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितल्यावर दुसऱ्या बाजूने ती विवाहिताच बोलू लागली आणि पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी तातडीने हा प्रियकर आणि कराड येथे गेलेली ती विवाहिता यांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण खुनाचा उलगडा झाला.
कशी केली हत्या आणि मृतदेह कोणाचा?
ही घटना १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. किरण या २३ वर्षीय विवाहितेने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याच चित्र निर्माण केले. प्रियकर २० वर्षीय निशांत सावंत आणि किरण सावंत यांचे काही महिन्यापासून अफेअर सुरू होते. त्यांना नेहमी सोबत राहायचे होते म्हणून किरणने गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचे दाखवायचे असे ठरवले. मात्र यासाठी कोणाचातरी मृतदेह यात असणे आवश्यक असल्याने किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला.यानंतर त्याने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ येथील सावंत वस्ती येथे घेऊन आला. यानंतर दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटने दिवशी या गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवून दिली. यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला. रात्री अडीचच्या सुमाराला गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरण हिला घरातून बाहेर बोलवून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. यानंतर गंजी पेटवून निशान निघून गेला. आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले . यात निशांत ही सामील होता. या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले. मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय वाढला.
सुरुवातीला पोलिसांनी पतीची चौकशी केली परंतु पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचे दिसल्याने. यानंतर किरणच्या मोबाईल सीडीआरवरून निशांतपर्यंत पोलीस पोहचले आणि निशांतने किरणच्या मदतीने केलेल्या या सस्पेन्स खून प्रकरणाचा उलगडा केला. सध्या विवाहिता किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या किरणला दोन वर्षाची गोड मुलगी देखील आहे.
कारच्या चाकातील हवा कमी असल्याचा चोरट्यांनी बहाणा केला अन् रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला