Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

विद्यार्थिनीच्या शुल्काबाबतचा वाद आणि त्यानंतर वसतिगृहात झालेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर ‘विनापरवानगी प्रवेश’ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 11:19 AM
COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या व्हिडिओवरून सुरू झालेल्या वादाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. वसतिगृह परिसरात विनापरवानगी प्रवेश करून घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की व विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आणि एनएसयूआयच्या १५० कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी वसतिगृह परिसरात आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींविरुद्धही विद्यापीठ प्रशासनाने तक्रार केली आहे. विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (वसतिगृह विभाग) डॉ. राजू पाचकोर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, सीओईपीच्या वसतिगृह परिसरात सुमारे दहा इमारती असून, त्यामध्ये सुमारे दोन हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहतात. वसतिगृहात बाहेरील व्यक्तींना पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

१९ ऑगस्ट रोजी एनएसयूआयच्या काही कार्यकर्त्यांनी एका विद्यार्थिनीचा तिच्या इच्छेविरुद्ध व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. या विद्यार्थीनीचा प्रवेश अनाथ विद्यार्थी कोट्यातून झाला असतानाही तिच्याकडून सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे शुल्क आकारण्यात आल्याचा अपप्रचार करण्यास तिला भाग पाडल्याचा दावा तक्रारीत आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाची बदनामी झाल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी एनएसयूआय कार्यकर्त्यांनी वसतिगृहाचे गेट जबरदस्तीने उघडून सुरक्षारक्षकांना धक्का देत आत प्रवेश केला. विद्यार्थिनींच्या वसतिगृहासमोर जोरदार घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला वसतिगृह परिसरातून बाहेर काढले. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

माध्यम प्रतिनिधींवरही तक्रार; प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल

या प्रकरणात माध्यम प्रतिनिधींवरही तक्रार करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनीच्या शुल्काबाबतचा वाद आणि त्यानंतर वसतिगृहात झालेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर ‘विनापरवानगी प्रवेश’ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वसतिगृहाची सुरक्षा राखणे प्रशासनाची जबाबदारी असली, तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे वार्तांकन करणार्‍या माध्यम प्रतिनिधींवरही तक्रार दाखल करण्याचा निर्णय कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे.

Nagpur FDA Actoin : तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

Web Title: Fir registered against congress nsui activists in coep clash case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Congress Party
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
1

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
2

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
3

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
4

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.