Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

ऑगस्ट महिन्यापासून फोन आणि मेसेजद्वारे पैशांची मागणी केली जात होती. 17 सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे आणि इतर काही लोकांनी डॉ. गायकवाड यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी त्यांना एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 27, 2026 | 09:00 AM
दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल

दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : ‘बिग बॉस’ मराठी फेम दिव्या शिंदेवर पुण्यातील एका डॉक्टरच्या घरात घुसून त्यांना पट्ट्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. रील स्टार दिव्या शिंदेसह 10 जणांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्या शिंदेला डॉक्टरने ५ लाख रुपयांची खंडणी दिली नाही, तेव्हा त्यांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याची कार पळवून नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. विद्याधर गायकवाड यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ‘आर्ट इन्व्हेन्शन फेस्टिव्हल’च्या प्रमोशनच्या बदल्यात आरोपी ५ लाख रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, ऑगस्ट महिन्यापासून फोन आणि मेसेजद्वारे पैशांची मागणी केली जात होती. 17 सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे आणि इतर काही लोकांनी डॉ. गायकवाड यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी त्यांना एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास गुंडांकडून मारहाण करण्याची धमकी देण्यात आली.

Ulhasnagar Crime : 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’ ! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

दरम्यान, डॉ. गायकवाड यांनी दिव्यासह तिच्या साथीदारांना मारहाण थांबवण्याची विनंती केली, परंतु आरोपींनी नकार दिला. घरातील वस्तूंची तोडफोड केली. जेव्हा डॉ. गायकवाड यांनी ५ लाख रुपये दिले नाहीत, तेव्हा आरोपी त्यांची गाडी घेऊन पसार झाले. या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेले डॉ. गायकवाड यांच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिव्या शिंदेसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिव्या शिंदे, अण्णा धामधेरे आणि इतर आठ ते दहा जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) अमित शेटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कल्याणमध्ये खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण

दुसऱ्या एका घटनेत, कल्याणमधील व्यावसायिक जयराम नेहलानी यांचे 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या प्रकरणाचा उल्हासनगर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार आणि इस्टेट एजंट सचिन शिरसाट याच्यासह पाच आरोपींना अटक केली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

Web Title: Fir registered against divya shinde in extortion case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ
1

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
2

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
3

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
4

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.