
Accident News: नवरात्रीत काळाचा घाला! माता मंदिराजवळ भरधाव ट्रकचा कहर; १२ भाविकांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीमुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत शीतला माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. छिनोरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार असून या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धान्याने भरलेला ट्रक या मार्गावर आला. पोलिसांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तीव्र उतारामुळे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित ट्रक वेगाने मंदिर परिसराकडे धावला. या ट्रकने रस्त्यालगतची दुकाने आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धडक दिली. त्यानंतर ट्रक मंदिराच्या बाहेरील भिंतीला आणि गेटला जाऊन आदळला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी आक्रोश आणि मदतीसाठी धावपळ सुरू झाली.
हेही वाचा:Crime News: मुलगी गरोदर असल्याचं कळताच बापाने उचललं धक्कादायक पाऊल; अखेर कोर्टाचा मोठा निर्णय!
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. ग्वालियरचे एसएसपी धर्मवीर सिंह यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ३९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच ते सहा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. काही जखमींना फ्रॅक्चर झाले असून इतरांवरही उपचार सुरू आहेत.
Gwalior, Madhya Pradesh: Twelve people were killed and 39 injured after a truck went out of control while descending a hill near the historic Sheetla Mata Temple, around 18 km from the district headquarters. The injured, including children, women and two police personnel, were taken to J.A. Hospital, where five are in critical condition. — IANS (@ians_india) October 17, 2026
या दुर्घटनेत कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात बचावकार्य राबवण्यात आले असून पोलिसांकडून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे. नवरात्रीच्या काळात मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे सुरक्षेचा आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Ans: मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे शीतला माता मंदिराच्या मार्गावर ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
Ans: धान्याने भरलेला ट्रक तीव्र उतारावर अनियंत्रित होऊन मंदिर परिसरातील भाविकांच्या गर्दीत घुसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.