crime (फोटो सौजन्य: social media )
कल्याणमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कल्याणमधील ४ वर्षीय मुलीचा अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात तिच्या मावशी आणि पतीला अटक करण्यात आली आहे. आठ महिन्यानंतर पोलिसांनी आरोपींना रायगड येथून अटक केली आहे. मावशीने जबाबदारी घेतली परंतु तिच्या वागण्याबद्दल तिला मारहाण केली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह जंगलात नेउन फेकला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील हे चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगत असतांना, तिच्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला आणि त्या मुलीला तशीच सोडून गेली होती. त्यानंतर नातेवाईकांनी चुलत मावशी अपर्णा कांबरी आणि तिचा पती प्रथमेश कांबरी यांनी मुलीची जबाबदारी घेतली. मात्र अवघ्या चार वर्षाच्यामुलीला शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत नियम समजत नाहीत, या कारणावरून वारंवार मारहाण केली जात होती. म्हराहणीमध्ये तिचा मृत्यू झाला. हत्या झाल्यानंतर मृतदेह गोणीत ठेवून त्यावर गादी गुंडाळली आणि कर्जत -भिवपुरीतील चिंचवली गावाजवळच्या जंगलात फेकून दिला.
काही दिवसानंतर मुलीच्या आत्याने तिला सांभाळण्यासाठी मागणी केली होती. आरोपी कांबरी दाम्पत्याने मोबाईल बंद करून पळ काढला. त्यामुळे आत्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अपर्णा व प्रथमेश कांबरी हे दोघेही गेल्या सात-आठ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होते. बराच तपासणे पोलिसांनाही खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली आहे.
अपर्णा व प्रथमेश कांबरी या दोघांना ११ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जंगलात फेकलेला मृतदेह ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.
गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
एका गर्भवती महिलेने दोन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत त्या चिमुकलीसह तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर मातेच्या उदरात वाढत असलेल्या नवजात बाळाचाही जग पाहण्याअगोदरच मृत्यू झाला.
लाडखेड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ब्रह्मी गावात मंगळवारी (दि. १२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पूजा मोहन नेमाने (२५), नव्या मोहन नेमाने (२) (रा. ब्रह्मी) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. मंगळवारी पूजाने आपल्या लेकीला शेल्याने पोटाला घट्ट बांधले. त्यानंतर दोघींनी गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. अल्पावधीतच पाण्यात श्वास गुदमरून दोघींचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेऊन त्या दोघींनाही वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दोघींचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.