कोपरगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात 8 ऑगस्ट रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच कोडं अखेर उलगडलंय. महिलेच्या पतीनेच तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळल्याची पोलीस तपासात उघड झाला आहे. मृत महिलेचं नाव वनिता उर्फ वर्षा मोहिते असे आहे. तर आरोपीचे नाव संजय हिरामण मोहिते असे आहे. न्यायालयीन दावे सुरु असतांना वारंवार येणाऱ्या वारंटमुळे पतीनेच पत्नीचा कट रचून काटा काढल्याचा पोलीस तपासात उघड झाला आहे.
नेमकं काय घडलं?
कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ ८ ऑगस्टला एका ४५ वर्षीय महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत या मृतदेहाचे कोड उलगडले आहे. संजय हिरामण मोहिते याने आपल्या साथीदार मेव्हण्यासह मिळून कौटुंबिक वादातून केला असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.
हत्या का करण्यात आली?
वनिता उर्फ वर्षा मोहिते ही नागपूर जिल्ह्यातील गुमगाव हिंगाणा येथे तिच्या आई वडिलांकडे राहत होती. आरोपी पती संजय हिरामण मोहिते याची दोन लग्न झाले होते. तर मृत महिला वनिता ही आरोपीची पहिली पत्नी होती. त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. हा वाद कोर्टात सुरु होता. हा वाद न्यायालयीन असल्याने त्याला वारंवार वारंट येत होते. परिणामी त्याच्या दुसर्या लग्नांवरही याचा परिणाम होत होता. त्यामुळे आरोपीने दुसर्या पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
वनिता जी कोपरगावला आली होती तेव्हा आरोपी संजय मोहिते याने त्याचा मेव्हणा गजानन मोहीते यांच्या मदतीने पत्नीला कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ नेला. तिथे तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धवट जाळून टाकण्यात आला. हा त्यांचा अयशस्वी प्रयत्न होता. आरोपी पती संजय मोहिते याला शहर पोलिसांनी सवळीविहिर येथून ताब्यात घेतले आहे. सादर आरोपीला न्यायालयात हजार करण्यात आले असून सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीचा साथीदाराचा शोध शहर पोलीस घेत आहे.