पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतील आय लव यू म्हणाल्याचे रागातून हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना चंदननगरच्या आंबेडकर वसाहतीत 12 ऑगस्ट (मंगळवार) रोजी रात्री 8.30 वाजता घडली आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) अशी हत्या झालेल्या व्यक्तीने नाव आहे. तर सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) अशी आरोपींची नवे आहेत. आरोपींला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांना पुण्यातील चंदननगर परिसरात बेवारस मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह हा साईनाथ उर्फ खलबली दत्तात्रय जानराव याचे असल्याचे समोर आले. त्याला दारूचे व्यसन असल्याचीही माहिती समोर आली आहे. आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला आला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.
अधिक चौकशी केली असता दोन्ही आरोपींची नाव समोर आली आहे. मृत साईनाथ याने आरोपीने सोन्या उर्फ आदित्य संतोष वाळेकर याच्या चुलतीची छेड काढली होती. एवढच नाही तर तो तिला आय लव्ह यू असं देखील म्हणाला होता. त्यामुळे आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साईनाथला त्यांनी तसंच सोडलं आणि ते निघून गेले. मात्र जखमी झालेल्या साईनाथचा मृत्यू झाला.
दरम्यान आरोपी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर यानेच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली होती. ,तर पोलिसांच्या तपासात त्यानेच मित्राच्या मदतीने या व्यक्तीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली औन अधिक तपास सुरू आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1)3(5) अंतर्गत गुन्हा नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.
मावळात वाढली दादागिरी! सरपंचाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला
मावळमधील अनेक धक्कादायक आणि गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. मावळातील वळवंती गावात सरपंचाने तरुणाला जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मावळ भागामध्ये दादागिरी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी (दि.10) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात सरपंचासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.