Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; निवृत्त शिक्षकाला तब्बल 11 लाखांचा गंडा, एक फोन केला अन्…

एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख राकेश अग्रवाल असल्याचे भासवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2026 | 08:17 AM
डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल

डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : ठाणे शहरातील कापूरबावडी परिसरात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय निवृत्त शिक्षकाला डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

तक्रारदार किशोर राव यांना २१ एप्रिल २०२६ रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख राकेश अग्रवाल असल्याचे भासवले. आरोपींनी तक्रारदारावर पैशांची अफरातफर व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांना जम्मू-काश्मीर आणि लखनौमध्ये गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. घाबरवून टाकल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले आणि कोणाशीही बोलू नये किंवा व्हिडिओ कॉल बंद न करण्याची धमकी दिली.

दरम्यान, पोलिस गणवेशात असलेल्या आरोपींनी तक्रारदाराच्या बँक खात्यांची व गुंतवणुकीची माहिती घेतली. त्यानंतर तक्रारदाराची ११ लाख रुपयांची फिक्स डिपॉझिट मोडायला लावून, ती रक्कम एका खाजगी कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर करायला भाग पाडले. सायबर कक्षात जाऊन माहिती घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पारमेश्वर धांडे करत आहेत.

रत्नागिरीतही असाच प्रकार उघडकीस…

वारंवार फोन करून आतंकवादी सहभाग, बँक खात्यामध्ये २ कोटींचे मनी लॉन्ड्रिग झाले आहे, असे सांगून आणि नाशिक पोलिस असल्याचे भासवून २५ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत तालुक्यातील जयगड-साखरी बौद्धवाडी येथे ही घटना घडली. फिर्यादी सुधाकर लक्ष्मण जाधव (वय ६१, रा. जयगड, साखरी बौद्धवाडी, रत्नागिरी) यांना अनोळखी तिघांनी वारंवार फोन करून नाशिक पोलिस असल्याचे भासविले. त्यांचा आतंकवादी हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचे सांगितले.

हेदेखील वाचा : NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest’ स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान

Web Title: Fraud in the name of digital arrest retired teacher cheated of rs 11 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • Digital Arrest
  • Fraud Case
  • Thane Crime

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी सावकाराकडून कर्ज घेणं पडलं महागात; कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सह्या घेतल्या अन्…
1

व्यवसायासाठी सावकाराकडून कर्ज घेणं पडलं महागात; कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सह्या घेतल्या अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.