Crime News: बिटकॉइनमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल ९६.९३ लाखांची फसवणूक
पिंपरी: बिटकॉइन आणि युएसडीटी या डिजिटल करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत मोठा नफा देण्याचा बहाणा करून एका व्यक्तीकडून ९६.९३ लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना १५ जुलै २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत रावेत येथे घडली. या प्रकरणी रावेत येथील पीडित व्यक्तीने पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि बँक खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला फोन वरून संपर्क केला. बिटकॉइन आणि युएसडीटी करन्सी मध्ये ट्रेडिंग केल्यास दररोज १०० डॉलर प्रॉफिट मिळेल, असे फिर्यादी यांना सांगण्यात आले. त्यांना मिळालेल्या प्रॉफिट मधील २० टक्के कमिशनची रक्कम एका लिंकच्या माध्यमातून द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी आरोपींना वेळोवेळी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात ९६ लाख ९३ हजार २८९ रुपये पाठवले. त्यानंतर त्यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.
खातेदाराला अंधारात ठेवत ‘FD’ वर काढले पाच लाखांचे कर्ज
खातेदाराच्या परस्पर त्याच्या एफडी रकमेला मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने पाच लाख रुपयांचे कर्ज काढले. ही कर्जाची रक्कम खातेदाराच्या खात्यातून परस्पर इतर खात्यावर ट्रान्सफर करत पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ५ जुलै २०२४ रोजी पूर्णानगर, चिखली येथे घडली. मात्र हा प्रकार एप्रिल २०२५ मध्ये उघडकीस आला आहे.
Crime News: खातेदाराला अंधारात ठेवत ‘FD’ वर काढले पाच लाखांचे कर्ज; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडित व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एमआयडीसी चिंचवड शाखेत काही रक्कमेची एफडी केली आहे. ती रक्कम मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या नावावर त्यांच्या परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले.
ही कर्जाची रक्कम फिर्यादी यांच्या बँक खात्यावर आली असता आरोपीने ती रक्कम इतर खात्यावर ट्रान्सफर करून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली. याबाबत फिर्यादीस काहीही कल्पना नव्हती. एप्रिल २०२५ मध्ये बँकेशी संपर्क केल्यानंतर त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
Cyber Crime: आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात कोटींची फसवणूक
गुंतवणुकीच्या बहाण्याने सात कोटींची फसवणूक
एका व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांच्या नावाने व्हाट्स अप मेसेज आणि ईमेल करून पैसे पाठवण्यास भाग पाडले. यामध्ये व्यक्तीची तब्बल सात कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात घडली. या प्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार +49 1636814985, +33 7578121507 हे क्रमांक धारक आणि 9550880238736200481 हा अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.