Ichalkaranji Crime: पूर्ववैमनस्यातून रागाच्या भरात मित्राचा खून; संशयित पोलीसांच्या ताब्यात
इचलकरंजी : शहापूर येथील लोटस पार्कच्या प्रवेशद्वारासमोरील कमानी समोरील मोकळ्या जागेत जुन्या वाद उफाळून आल्याने रागाच्या भरात मित्राचा मित्रानेच कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. गणेश रमेश पाटील (वय २१ रा. आगर ता. शिरोळ) असे मृताचे नाव असून अभिषेक सुकुमार मस्के (वय १९, रा. आगर) याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून ते शिरोळ तालुक्यातील मौजे आगर येथे राहण्यास आहेत. या दोघांमध्ये दोन वर्षांपूर्वी गावातच काही कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी तो वाद मिटविण्यात आला होता. शुक्रवारी (१३ जून) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा अभिषेक व गणेश यांच्या वाद झाला. वादाचे पर्यावसान मारामारीत होऊन रागाच्या भरात अभिषेक याने कोयत्याने गणेश याच्या डोक्यात, मानेवर, तोंडावर गंभीर वार केले. त्यामुळे गणेश रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर घटनेनंतर अभिषेक हा फरार झाला.
हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची माहिती शहापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असलेने प्राथमिक उपचार करून गणेशला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना गणेश याचा रात्रीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद नामदेव गणपती चव्हाण (रा. कोरोची) यांनी शहापूर पोलीसात दिली आहे. घटनास्थळी उपाधीक्षक समीरसिंह साळवे व पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी भेट देऊन माहिती घेत तपासाबाबत सूचना केल्या.
किरकोळ कारणावरून मारामार
विनाकारण शिवीगाळ करण्यासह अंगावर धावून जात लाकडी मार्याने डोक्यात मारुन सदाशिव निगाप्पा पट्टणकुडे (त्तय 50 रा. लक्ष्मीमाळ कबनूर) यांना जखमी केल्याप्रकरणी पोपट गणपती चौगुले (रा. लक्ष्मीमाळ कबनूर) यांच्यावर तर वडीलांना मारहाण केल्याच्या कारणावरुन शुभम सदाशिव पट्टणकुडे (वय 25) याने तीन साथीदारांसह दहशत माजवत घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
Ichalkaranji News: चार महिन्यांपूर्वी नवऱ्याने आणि आता पत्नीने संपवले जीवन; नेमके प्रकरण काय?
सदाशिव पट्टणकुडे व पोपट चौगुले हे मित्र आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पट्टणकुडे हे चौगुले यांच्या कारखान्यात तीन नंबरचा पट्टी पाना मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी चौगुले यांनी विनाकारण पट्टणकुडे यांना अर्वाच्च शिवीगाळ करत अंगावर धावून जात ढकलून दिले. तसेच लाकडी मार्याने डोक्यात मारल्याने पट्टणकुडे हे जखमी झाले आहे. याप्रकरणी पट्टणकुडे यांच्या फिर्यादीवरुन चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.