इचलकरंजीत महिलेची आत्महत्या (फोटो- istockphoto)
इचलकरंजी: तारदाळ (ता. हातकणंगले) येथे एका युवतीने राहत्या घरी छताच्या लाेखंडी हुक्काला दाेरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आराेशी प्रणव पारखे (वय १९ रा. श्रीरामनगर) असे तिचे नाव आहे. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अमर शंकर माेटे (वय ४३ रा.तारदाळ) यांनी शहापूर पाेलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
आराेशी हिचे प्रणव पारखे याच्याशी प्रेमविवाह झाला हाेता. चार महिन्यांपूर्वी प्रणव याने गळास घेऊन आत्महत्या केली हाेती. त्या घटनेनंतर आराेशी ही काेल्हापूरहून आपल्या आई-वडिलांकडे तारदाळ येथे राहण्यास आली हाेती. तिचे आई-वडील कामावर गेले असताना घरी काेणी नसल्याचे पाहून आराेशीने डाव्या हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिला यश न आल्यामुळे तिने स्लॅबच्या लाेखंडी हुकास दाेरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता आराेशीने गळास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नाेंद शहापूरप पाेलिसात झाली आहे.
एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या
हरियाणातील पंचकुलातील एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये चार प्रौढ व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पंचकुला येथील सेक्टरमध्ये कार उभी करुन या सगळ्यांनी विष पियुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
कार मध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या, कारण आला समोर…; चिट्ठीत काय?
नैराश्याच्या गर्तेत आत्महत्या
मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, आई-वडील आणि दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. प्रवीण मित्तल भंगाराचा व्यवसाय करायचे. काही काळापासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोझा झाला होता. त्यामुळे ते नैराश्यात होते. याच कारणामुळे कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या सत्संगला गेले होते. तिथून परत येताना सगळ्यांना सामूहिक आत्महत्या केली. आपल्या मृत्यूनंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही प्रवीण मित्तल यांनी विष दिल्याची माहिती समोर आली आहे.
चिट्ठीत काय?
तपासा दरम्यान पोलिसांना गाडीतून दोन पानी चिठ्ठी सापडली. त्याचा सगळं तपशील समोर आला आहे. प्रवीण मित्तल यांनी चिट्ठीत म्हटले होते की, हा सगळा माझा दोष आहे. यासाठी माझ्या सासू-सासऱ्यांना त्रास देऊ नये.