Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli News: ‘घरी जायचंय’ म्हणाली अन् काही तासांतच मृत्यू; आश्रमशाळेतील घटनेने खळबळ

घरी जाण्याचा आग्रह करणाऱ्या १४ वर्षीय मुलीला वसतिगृहातच थांबवण्यात आले आणि काही वेळातच तिच्या मृत्यूची बातमी समोर आली... गडचिरोलीतील आश्रमशाळेतील या घटनेने खळबळ उडाली आहे. पालकांच्या गंभीर आरोपांनंतर आदिवासी विकासमंत्र्यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 13, 2026 | 03:58 PM
Gadchiroli News: ‘घरी जायचंय’ म्हणाली अन् काही तासांतच मृत्यू; आश्रमशाळेतील घटनेने खळबळ

Gadchiroli News: ‘घरी जायचंय’ म्हणाली अन् काही तासांतच मृत्यू; आश्रमशाळेतील घटनेने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • १४ वर्षीय राणू हलामीचा वसतिगृहात मृत्यू
  • अधीक्षिकेवर विद्यार्थिनीला खोलीत बंद केल्याचा आरोप
  • अधीक्षिकेला निलंबित करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेतील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. राणू कृष्णा हलामी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. काल संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृत विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने तिला घरी जायचे होते. मात्र, वसतिगृहाच्या अधीक्षिका दिपाली चांभाळे यांनी तिला खोलीत बंद केल्याचा गंभीर आरोप तिच्या पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे राणूवर मानसिक तणाव निर्माण झाल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.

पालकांची निष्पक्ष चौकशीची मागणी

या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कुटुंबाला २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मृत विद्यार्थिनीचे वडील कृष्णा चिनू हलामी आणि आई मनीषा हलामी यांनी केली आहे.

हेही वाचा: Solapur Crime News: २० एकर जमिनीवरून सांगोल्यात खळबळ; माजी आमदार आणि मुलावर गंभीर आरोप

मंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी आज कुरखेडा येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांची बाजू जाणून घेतली. पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांची दखल घेत मंत्र्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनासह आदिवासी विकास विभागाच्या स्थानिक यंत्रणेची कानउघाडणी केली. तसेच वसतिगृह अधीक्षिकेला निलंबित करण्याचे आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, त्यांच्या तक्रारींची दखल आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणूच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, पालकांनी केलेल्या आरोपांत कितपत तथ्य आहे आणि चौकशीतून कोण जबाबदार ठरते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Gadchiroli ashram school 14 year old student death inquiry sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Gadchiroli News
  • School Students
  • Student Death

संबंधित बातम्या

अपुऱ्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घ्यावा लागतोय झाडाचा आधार; दोन वर्ग झाडाखाली
1

अपुऱ्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घ्यावा लागतोय झाडाचा आधार; दोन वर्ग झाडाखाली

नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचावले, पण अंघोळीसाठी जाताच काळाने गाठले; जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत
2

नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचावले, पण अंघोळीसाठी जाताच काळाने गाठले; जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.