Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू; गडचिरोली येथील घटना

गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीताताई हिंगे यांचा पाचगावजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला. नागपूरहून परतताना गाडीला समोरून आलेल्या वाहनाची जोरदार धडक बसली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 08, 2025 | 02:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नागपूरवरून परतताना पाचगाव येथे रस्ते अपघातात गीताताई हिंगे यांचा मृत्यू.
  • त्यांचे पती जखमी.
  • नुकताच गीताताई हिंगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
गडचिरोली: गडचिरोली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी घडली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात दुःख व्यक्त केले जात आहे.

बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल

कसा झाला अपघात?

रविवारी गीताताई हिंगे या त्यांच्या खासगी कामासाठी नागपूरला गेल्या होत्या. रात्री उशिरा गडचिरोलीकडे परत येताना पाचगावजवळ त्यांच्या चारचाकीला समोरून येणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पतींना किरकोळ दुखापती झाली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीला सुरवात केली. पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.

गीताताई हिंगणे यांचा राजकीय प्रवास

गीताताई हिंगे या नुकताच राष्ट्रवाद काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये दाखल झाल्या होत्या. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या प्रवेशानंतर लगेच त्यांची महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. गीताताई हिंगे या पूर्वी भाजपमध्ये अत्यंत सक्रिय पदाधिकारी म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी भाजपच्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला रामराम केला. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आगमनाने पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

सामाजिक उपक्रमांत महत्त्वाची भूमिका

गीताताई हिंगे या राजकारणाबरोबरच सामाजिक उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या आणि या संस्थेमार्फत अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मदत केली. त्यांनी विशेषत: कोरोना काळात त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अन्नधान्य, औषधे आणि अन्य आवश्यक साहित्य गरजूंना पोहोचवले. त्यांच्या या कामाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली होती. त्यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: गीताताई हिंगे यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: पाचगावजवळ समोरून आलेल्या वाहनाच्या धडकेत त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

  • Que: त्यांचा राजकीय प्रवास कसा होता?

    Ans: पूर्वी भाजप पदाधिकारी, 2025 ला राष्ट्रवादीत प्रवेश, नंतर महिला प्रदेश उपाध्यक्षा नियुक्ती.

  • Que: सामाजिक कार्यात त्यांचे योगदान काय?

    Ans: ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा, गरीब-गरजूंना मदत, कोरोना काळात मदतकार्य.

Web Title: Gadchiroli crimenationalist women state vice president geetatai hinge died in a gruesome accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • Accident
  • crime

संबंधित बातम्या

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत
1

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत

बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल
2

बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू
3

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू

Palghar Crime: रक्षकच भक्षक! हवालदारानेच केले महिलेवर लैंगिक अत्याचार; चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि…
4

Palghar Crime: रक्षकच भक्षक! हवालदारानेच केले महिलेवर लैंगिक अत्याचार; चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.