नेमकं प्रकरण काय?
१७ फेब्रुवारी २०१७ला मुख्य आरोपी पल्सर सुनी आणि त्याच्या साथीदारांनी रात्री अभिनेत्रीचे तिच्या कारमध्ये घुसून अपहरण केले. त्यानंतर चालत्या गाडीत तिच्यावर हल्ला करत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर, आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील काढले. याप्रकरणी न्यायालयाने ही घटना एक सुनियोजित कट असून सर्व सहा मुख्य आरोपींना अपहरण, गुन्हेगारी कट, सामूहिक बलात्कार, चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे आणि आणि आयटी कायद्यांतर्गत आरोप सिद्ध झाल्याचे सांगितले.
सुनाविनीत काय घडलं?
न्यायाधीश हनी एम. वर्गीस यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की सरकारी वकिलांचे पुरावे मुख्य आरोपीपुरते मर्यादित होते आणि दिलीपचा सहभाग सिद्ध होऊ शकला नाही असे त्यांनी आदेशात म्हंटले आहे. हे प्रकरण हाय-प्रोफाइल होता. त्यामुळे यात २०० हून अधिक साक्षीदार यात सहभागी होते. या प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक मोठ्या नावांच्या साक्षींचा समावेश होता. अनेक तपास अधिकारी व तपास पथक बदलण्यात आले, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची देखील फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. जामीन रद्द करण्याच्या प्रयत्नांमुळेही हा खटला चर्चेत राहिला.
अभिनेता दिलीपवर कोणते आरोप?
मल्याळम इंडस्ट्रीतील सुपरस्टार दिलीपला तपास यंत्रणेने या प्रकरणात आठवा आरोपी म्हंटले होते. पल्सर सुनी टोळीसोबत या गुन्ह्याचा कट रचल्याचा आणि नंतर पुरावे लपवण्याचा आणि तपासादरम्यान साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असे आरोप करण्यात आले होते. एवढेच नाही तर त्याच्यावर जामीन अटींचे उल्लंघन केल्याचाही आरोप होता. दरम्यान, वर्षानुवर्षे साक्ष, उलटतपासणी आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने दिलीपविरुद्ध पुरेसे पुरावे नाही असे निकष काढत त्याला निर्दोष सोडले.
सहा आरोपींवर आरोप सिद्ध
दिलीपला न्यायालयाने क्लीन चिट दिली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीसह ६ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट) , भारतीय दंड संहितेच्या कलम ३४२ (बेकायदेशीरपणे बंदिस्तात ठेवणे), ३५४ आणि ३५४ ब (विनम्रता आणि कपडे उतरवण्याचा प्रयत्न), ३६६ (अपहरण), भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (आयटी कायदा) कलम ६७ आणि ६७ अ अंतर्गत अश्लील साहित्य तयार करणे आणि प्रसारित करणे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू
Ans: तपास आणि साक्षींमध्ये त्याचा सहभाग सिद्ध करणारे पुरावे अपुरे असल्याने.
Ans: अभिनेत्रीचे अपहरण करून चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग.
Ans: मुख्य आरोपी पल्सर सुनीसह ६ जणांना IPC व आयटी कायद्यांतर्गत आरोप सिद्ध.






