
Gajya Marane bail by Special Mocca court in Kothkarud MP Muralidhar Mohol worker assault case
पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले होते. यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड
कोथरुडमधील या घटनेनंतर पोलिसांनी गज्या मारणे विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच मारहाण झाल्यानंतर मोक्का कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, या मारहाण प्रकरणात मोक्कानुसार कारवाई झालेल्या कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. हा पुणे पोलिसांसाठी आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मजुरांच्या पिकअपला ट्रॅव्हलची जोरदार धडक; सहा महिला गंभीर जखमी
या जामीनानंतर वकील विजयसिंह ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “गजानन मारणे यांचा संबंधित प्रकरणात कोणताही सहभाग नव्हता. पण, त्यांना या प्रकरणात गुंतवले गेले. आम्ही न्यायालयिन लढा लढलो. शेवटी सत्याचा विजय झाला. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला,” अशी भूमिका गुंड गजानन मारणेचा वकील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी मांडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोथरूड परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.19 फेब्रुवारी 2025 रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती, त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांची वादविवाद झाला आणि त्यामुळे ते चौघे मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला. कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले.