
डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट
मुंबई : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचे नुकतेच समोर आले आहे. या आत्महत्या प्रकरणावरून अनेक आरोप केले जात आहेत. असे असताना आता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप गौरी गर्जेच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. गौरीचा तीन जणांनी मिळून गळा दाबून खून केला, असा आरोप गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी केला.
डॉ. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिकरित्या समोर आले आहे. मात्र, आता कुटुंबियांकडून आरोप केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडूनही त्यादृष्टीने तपास केला जात आहे. या आरोपांमुळे या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. डॉ. गौरी गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळीस्थित आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे पती अनंत गर्जे यांना अटक केली आहे. असे जरी असले तरी कुटुंबियांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे.
गौरीची आई अलकनंदा पालवे यांनी अनंत गर्जेला मिळालेल्या न्यायालयीन कोठडीवर संशय व्यक्त केला. आरोपी अनंतला या प्रकरणात एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी देण्याची गरज नव्हती. कारण, गौरी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती खंबीर तरुणी होती. आरोपीला एवढ्या लवकर का न्यायालयीन कोठडी दिली?, असा सवाल त्यांनी व्यक्त केला.
गौरी गर्जेंची राहत्या घरी आत्महत्या
गौरी पालवे यांनी मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर गौरीच्या मंडळींनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली. तपासात पोलिसांच्या हाती महत्वाची सीसीटीव्ही फुटेज लागलेले आहे. एवढेच नाही तर अनंत गर्जेच्या शरीरावरती असलेले जखम यांच्या बाबत देखील महत्वाची माहिती समोर आली आहे.
अंजली दमानिया यांचंही भाष्य
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले की, सकाळी आठ वाजताच मला फोन आला होता. आम्ही बीडवरून आलो आहोत आणि आम्हाला मदत हवी आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. यानंतर मी लगेच वरळी पोलीस स्टेशनला गेले. तिथे तिचे आई-वडील खूप रडत होते. त्यांच्या जावयानेच त्यांना पहिला फोन केला होता. तुमची मुलगी आत्महत्या करत आहे, तिला समजवा. त्यानंतर पाच मिनिटांनी गौरीच्या आईला फोन करून त्यानेच तिने गळफास घेतल्याचे सांगितले.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात नवे CCTV पुरावे; अनंत गर्जेवर गंभीर आरोप, 28 जखमांसह पोलिसांच्या ताब्यात