Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गे डेटिंग’ अ‍ॅपचा सापळा; अकोल्यात बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ करून ब्लॅकमेल; दोघांना अटक

'गे डेटिंग' अ‍ॅपवरून ओळख झालेल्या एका बँक अधिकाऱ्याला सापळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून आरोपींनी ब्लॅकमेल करत तब्बल ८० हजार रुपयांची उकळणी केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2025 | 09:06 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Follow Us:

अकोला: डिजिटल युगात डेटिंग अ‍ॅप्सचा वापर झपाट्याने वाढत असतानाच, त्याचा गैरवापर करत फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांना निमंत्रण मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव अकोल्यातील एका घटनेतून समोर आले आहे. ‘गे डेटिंग’ अ‍ॅपवरून ओळख झालेल्या एका बँक अधिकाऱ्याला सापळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून आरोपींनी ब्लॅकमेल करत तब्बल ८० हजार रुपयांची उकळणी केली. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.

Froud News : पुण्यातील तांबे व्यापाऱ्याची फसवणूक; तब्बल 48 लाखांना गंडवले

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याची एका अनोळखी व्यक्तीशी समलैंगिक डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झाली. सुरुवातीच्या संवादानंतर मैत्री झाली आणि दोघांनी १४ जून रोजी प्रत्यक्ष भेटण्याचे ठरवले. आरोपी मनीष नाईक याने हिंगणा फाट्यावर पीडित अधिकाऱ्याची भेट घेतली आणि त्याला शहरातील नदीकिनाऱ्यावर नेले. तिथे दोघांमध्ये समलैंगिक संबंध झाले.

हे संबंध होत असतानाच मनीष नाईकने त्याचे इतर तीन साथीदार घटनास्थळी बोलावले. त्यानंतर चौघांनी मिळून बँक अधिकाऱ्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि या संपूर्ण घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले. नंतर त्याच व्हिडीओच्या आधारे पीडित अधिकाऱ्याला धमकावण्यात आले. “हा व्हिडीओ व्हायरल करू” अशी भीती दाखवत सुरुवातीला ३० हजार रुपये आणि नंतर टप्प्याटप्प्याने एकूण ७९,३०० रुपये आरोपींनी बँक अधिकाऱ्याकडून वसूल केले. या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून अखेर पीडित व्यक्तीने खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

योजना आखली
पोलिसांकडे आरोपींचे केवळ मोबाईल क्रमांक होते. पुरावे कमी असल्यामुळे पोलिसांनी हुशारीने योजना आखली. पीडित अधिकाऱ्याच्या मदतीने पुन्हा एकदा आरोपींना भेटण्याचा बहाणा करून ठिकाण ठरवले. त्या वेळी आरोपी मनीष नाईक प्रत्यक्ष स्थळी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून मयूर बागडे या दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली.

इंजेक्शनद्वारे शारीरिक नियंत्रण?
पोलिस तपासात अजून एक गंभीर बाब समोर आली आहे. आरोपी मनीष नाईक याच्याकडे काही प्रकारचे उत्तेजक इंजेक्शन्स आढळले. या इंजेक्शनच्या प्रभावाने शारीरिक संबंध सहज साधले जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर आणि चिंताजनक बनते.

उर्वरित आरोपी
सध्या दोघे आरोपी पोलिस कोठडीत असून, उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, याच पद्धतीने इतर समलैंगिक व्यक्तींनाही जाळ्यात ओढून फसवले गेले आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टोळीच्या इतर गुन्ह्यांचीही शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांचं आवाहन
खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडलेल्यांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा. तुमचं संरक्षण हे आमचं कर्तव्य आहे.”

लातूर हादरलं! चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..

Web Title: Gay dating app trap bank officer sexually assaulted blackmailed by making video in akola two arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • akola news
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai: मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले
1

Mumbai: मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा
2

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत
3

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू
4

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.