Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर त्याच्याच आईने मारहाण, गरम चाकूने चटके देणे आणि उपाशी ठेवून अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाने स्वतः व्यथा सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 03:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यात साडेतीन वर्षांच्या मुलावर त्याच्याच आईने अमानुष अत्याचार केल्याचा आरोप.
  • मुलाने गरम चाकूने चटके देणे, मारहाण करणे आणि जेवण न देण्याचा आरोप केला.
  • तक्रारीनंतर वागळे इस्टेट पोलिसांनी आरोपी आईला अटक करून तपास सुरू केला.
ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून माणुसकीला हादरवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर त्याच्याच सख्ख्या आईने अमानुष अत्याचार केल्याचा आरोप असून, मुलाने स्वतः सांगितलेल्या धक्कादायक व्यथेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “मम्मी मला रोज मारते, जेवायलाही देत नाही आणि गरम चाकूने चटके देते,” असे सांगत या चिमुकल्याने आपल्या वेदना मांडल्या. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी आरोपी आईला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील चिमुकला हा किसान नगर येथील शाळा क्रमांक ३ मध्ये शिकतो. तो काल दुपारी आपल्या आजीसोबत वागले इस्टेट येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत पोहोचला. चिमुकल्या अंगावरील जखमा आणि त्याच्या पाठीवर, हाता- पायांवर असलेले चटके पाहून तेथला उपस्थित सुन्न झाले. शिवसेना शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी बालकाची विचारपूस केली असता, त्याने आईने केलेल्या छळाची धक्कादायक माहिती दिली. यानंतर सुनील मोरे यांनी तातडीने बालकाला जवळच्या रुग्णालयात नेऊन त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले.

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

मम्मीने गळा इतका जोरात दाबला की…

रुग्णालयात उपचार घेत असतांना त्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याने आपल्यावर झालेला अत्याचार सांगितला. “मम्मीने मला गरम गरम चाकूने चटके दिले. ती मला रोज मारते आणि लाथा बुक्क्यांनी तुडवते. ती मला जेवायलाही देत नाही; आजीकडून जेवण घे, माझ्या घरी जेवण नाही असं सांगते. तिने माझ्या पाठीवर मारलं आणि एका दिवशी माझा गळा इतका जोरात दाबला की माझा दम घुटू लागला होता.” या निष्पाप बालकाच्या तोंडून हे ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

आरोपी आईला केली अटक

या घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेना शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह तात्काळ संबंधित महिलेचे घर गाठले. तिला जाब विचारल्यानंतर, महिला पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तिला वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी या अमानुष कृत्याची गंभीर दखल घेत पीडित बालकाच्या नातेवाईकांच्या मदतीने गुन्हा दाखल केला असून, आरोपी आईला अटक केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही धक्कादायक घटना कुठे घडली?

    Ans: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथे ही घटना घडली.

  • Que: चिमुकल्याने आईवर कोणते आरोप केले?

    Ans: आई रोज मारहाण करत होती, गरम चाकूने चटके देत होती, जेवायला देत नव्हती आणि गळा दाबल्याचाही आरोप मुलाने केला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आईला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Thane crime strangled and branded with a hot knife by his mother the harrowing ordeal of a three and a half year old child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
1

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
2

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
3

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
4

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.