Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठे झाड दुकानावर कोसळून 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बीएमसीच्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. झाड कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 03:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाड दुकानावर कोसळून भीषण दुर्घटना घडली.
  • कुर्ला पश्चिम येथे झाड कोसळून 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा मृत्यू.
  • घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन; बीएमसीच्या कारभारावर टीका.
मुंबई: मुंबईतील मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरात मोठे झाड दुकानावर कोसळल्याने 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरातील बीएमसी शाळेजवळ असलेल्या ‘गोम्स गाऊन बिल्डिंग’ परिसरात ही दुर्घटना घडली. रविवारी दुपारच्या वेळी अचानक जोरदार वारे सुटल्याने येथील एक मोठे झाड अचानक शेजारील दुकानावर उन्मळून पडले. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवकांचे स्वीय सहाय्यक रोशन शिंदे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला दिली. झाड कोसळले तेव्हा युनूस कुंदावाला हे दुकानातच हजर होते. झाडाचा प्रचंड ढिगारा दुकानावर पडल्याने ते त्यात गंभीररीत्या चिरडले गेले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्थीने त्यांना बाहेर काढून तातडीने जवळच्या ‘फौझिया हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा

वीज पुरवठा खंडित

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, बेस्ट (BEST) कर्मचारी आणि पालिकेच्या वॉर्ड ऑफिसचे मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने दुकानावर पडलेले झाड कापून बाजूला केले. या दुर्घटनेमुळे परिसरातील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. बेस्ट प्रशासनाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मनसैनिकांकडून रस्त्यावर आंदोलन

मनसैनिकांकडून रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे, कार्यकर्ते पोलिसांना भिडले आहेत. मनसैनिक आंदोलनावर ठाम आहेत. मनसेचे चांदिवलीचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्याकडून कुर्ल्याचा घटनेचा निषेध केला जात आहे. डोक्याला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला जातो आहे.

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरातील बीएमसी शाळेजवळील 'गोम्स गाऊन बिल्डिंग' परिसरात ही घटना घडली.

  • Que: या दुर्घटनेत कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा झाड कोसळून मृत्यू झाला.

  • Que: घटनेनंतर काय घडले?

    Ans: मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत बीएमसीच्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्न उपस्थित केले, तर प्रशासनाने झाड हटवून पुढील तपास सुरू केला.

Web Title: Mumbai another victim of bmcs negligence in mumbai 63 year old man dies after tree collapses in kurla mns workers clash with police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
1

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
2

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
3

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.