Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

पुण्यातील वाघोली येथे मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 12 तासांत साताऱ्यातून अटक केली. तांत्रिक विश्लेषण आणि वेगवान तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. किरकोळ वादातून झालेल्या या हत्येचा जलद उलगडा केल्याने वाघोली पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 12:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाघोलीत मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी 12 तासांत साताऱ्यातून अटक केली.
  • तांत्रिक विश्लेषण आणि विशेष तपास पथकाच्या मदतीने आरोपीचा अचूक मागोवा घेण्यात आला.
  • किरकोळ वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात मित्राच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 12 तासांत जेरबंद करण्यात वाघोली पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण, वेगवान तपास आणि अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी साताऱ्यात छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनाचा अल्पावधीत उलगडा झाल्याने वाघोली पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईचे कौतुक होत आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव सूरज साव (वय 35, रा. भालुका, जि. नाडीया, पश्चिम बंगाल) असे आहे. त्याच्यावर मित्र शिवशंकर सिंह यांची हत्या केल्याचा आरोप आहे. मृत शिवशंकर सिंह आणि आरोपी सूरज साव हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. कामानिमित्त ते एकाच खोलीत राहत होते. दरम्यान, दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचा राग आरोपीने मनात धरला आणि त्यातूनच त्याने मित्र शिवशंकर सिंह यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी 1 जुलै रोजी वाघोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी हा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याने तो राज्याबाहेर पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.

सातारा येथील आदर्शदीप नगर परिसरातील एका बांधकाम प्रकल्पावर छापा टाकला. तेथे लपून बसलेल्या सूरज साव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करण्यात आल्याने या खुनाच्या गुन्ह्याचा जलद उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीची शिफ्ट सुरू असताना एका कंपनीतील कामगारासोबत सहकाऱ्याने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कॉम्प्रेसरच्या उच्च दाबाच्या पाईपमुळे गंभीर दुखापत झाल्याने ४२ वर्षीय कामगाराचा जीव गेला असून, या घटनेने औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अनिस बाबा बनून आसिफ देत होता गुंगारा; मुंबईतील रेड लाईट परिसरातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला किती वेळात अटक करण्यात आली?

    Ans: वाघोली पोलिसांनी आरोपीला अवघ्या 12 तासांत अटक केली.

  • Que: हत्या कोणत्या कारणातून झाली?

    Ans: एकाच खोलीत राहणाऱ्या दोघांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने मित्राची हत्या केली.

  • Que: आरोपीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: सातारा येथील आदर्शदीप नगर परिसरातील एका बांधकाम प्रकल्पावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Pune crime friend murdered over a trivial dispute while sharing a room accused arrested within 12 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू
1

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Pune News: पुण्यात FDAची मोठी कारवाई! ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद; 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित
2

Pune News: पुण्यात FDAची मोठी कारवाई! ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद; 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन
3

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू
4

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.