गोव्यातील चार वर्षाच्या मुलाच्या हत्या प्रकरणी महिलेची चौकशी सुरू, ‘या’ कारणानं झाला मुलाचा मृत्यू; हत्येचा आरोप महिलेनं फेटाळला

चौकशी दरम्यान गोवा पोलीस सुचना सेठसह सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये गेले जिथे गुन्हा घडला होता. ती इथे यायला तयार होत नव्हती. तिने आपल्या मुलाचा खून केला नसल्याचे ती सतत पोलिसांना सांगत होती.

    गोव्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या हत्येच्या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ(4 year boy killed by his mother in goa) उडाली आहे. या मुलाची हत्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तिनं केली नसून त्याच्या जन्मदात्या आईनं केली आहे. सुचना सेठ (uchana Seth) असं या महिलेचं नाव असुन अत्यंत निदर्यपणे तिनं तिच्या मुलाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. सध्या ही आरोपी महिलेची गोवा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तिच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळावी यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र ती मुलाच्या हत्येचं सत्य सतत नाकारत आहे. दरम्यान, तिचा पती व्यंकट रमण हा सध्या गोव्यात आला असुन या प्रकरणी त्यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

    महिलेची चौकशी सुरू

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान गोवा पोलीस सुचना सेठसह सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये गेले जिथे गुन्हा घडला होता. ती इथे यायला तयार होत नव्हती. तिने आपल्या मुलाचा खून केला नसल्याचे ती सतत पोलिसांना सांगत होती. रात्री ती त्याच्या शेजारी झोपली आणि सकाळी उठल्यावर तो मुलगा मरण पावल्याचे तिला दिसले. मात्र, दुसरीकडे पोलिसांकडे बरेच पुरावे आहेत ज्यामुळे सुचनाने तिच्या मुलाची हत्या केल्याची बाब स्पष्ट होत आहे. म्हणूनच त्यांना तिला क्राईम सीनवर घेऊन तो सीन रिक्रिएट करायचा होता. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याने समुपदेशन केल्यानंतर ती अपार्टमेंटमध्ये जाण्यास तयार झाली. यानंतर, शुक्रवारी क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला.

    महिलेनं फेटाळला हत्येचा आरोप

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचनामा करताना त्यांना अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तर, यादरम्यान अपार्टमेंटच्या खोलीत कात्रीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सुचना सेठ यांनी उघड केले. मात्र ती हत्येची बाब नाकारत आहे. तिचे मौन गोवा पोलिसांसाठी अडचणीचे ठरत आहे, कारण पोलिस कोठडी लवकरच संपणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायाधीशांनी त्याला पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्याऐवजी तुरुंगात पाठवल्यास या खून प्रकरणाचा उकल होणे कठीण होईल. मात्र ती तिने हत्येचा आरोप फेटाळला आहे. आता पोलिसांसाठी या हत्या प्रकणाचा तपास लवकरात लवकर लावणं आव्हानात्मक होत आहे.