Gold hidden in cookware lid
Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक
लोक काय काय करतील याचा नेम नाही. हेच बघा, एका महाशयाने २४ कॅरेटचे ५२३ ग्रॅम सोने कशातून आणलं असेल, तर कुकवेअरच्या झाकणाच्या घन भागामध्ये लपवून ठेवले होते. कोणी विचार सुद्धा करणार नाही, यातून कोणी सोन्याची चोरी करेल. पण कस्टम अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या IGI विमानतळावर एकूण ३.७ कोटी रुपयांचं सोनं पकडलं, ते पण कुकवेअरच्या झाकणात लपवून ठेवलं होतं.
Customs officials at Delhi’s IGI Airport seized 523 grams of 24-carat gold, valued at around ₹3.7 crore, after finding 15 cut pieces concealed inside the solid core of a cookware lid. The passenger, travelling from Riyadh via Mumbai, was intercepted on August 17. Further… pic.twitter.com/8kiU9rjQZr — NDTV Profit News (@NDTVProfit) August 20, 2026
हा प्रवासी रियाधहून मुंबईमार्गे दिल्लीला आला होता. त्याला वाटलं असेल की आपण आरामात यातून बाहेर पडू आणि सोनं बाहेर घेऊन जाता येईल, पण आपले कस्टम अधिकारी फारच हुशार होते. त्यांना आधीच या गोष्टीची टीप होती की कोणीतरी सोन्याची स्मगलिंग करत आहे. चोरी करणाऱ्या माणसाला IGI विमानतळावर पकडण्यात आलं आहे. त्याच्यावर आता पुढची कारवाई होईलच. त्याचा पुढचा तपास सुरू आहे.






