मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! (Photo Credit- X)
DRI Mumbai has dismantled a gold smuggling syndicate under Operation Golden Nexus, seizing 3.2 kg of foreign-origin gold worth around ₹5 crore at Mumbai’s CSMI Airport. Seven people, including three Bangladeshi and Sri Lankan transit passengers, three airport staff members, and… pic.twitter.com/vFUCmrUY1o — IANS (@ians_india) June 7, 2026
डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विमानतळावरील काही कर्मचारी बँकॉकहून येणाऱ्या बांगलादेशी आणि श्रीलंकन ’ट्रान्झिट’ प्रवाशांकडून तस्करीचे सोने स्वीकारत होते आणि ते विमानतळ परिसराबाहेर एका स्थानिक नेटवर्ककडे पोहोचवत होते. या माहितीच्या आधारे सापळा रचून, डीआरआयने विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांना सोने एका ‘रिसीव्हर’कडे (सोने स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडे) पोहोचवण्यासाठी बाहेर नेताना पकडले. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन बस/कोच चालक आणि एका कोच मॉनिटरचा समावेश आहे.
Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
त्यानंतर, डीआरआयने या रॅकेटशी संबंधित तीन ट्रान्झिट प्रवाशांची ओळख पटवून त्यांनाही त्वरित अटक केली. यामध्ये एका बांगलादेशी आणि दोन श्रीलंकन नागरिकांचा समावेश होता, जे कनेक्टिंग फ्लाईट्सद्वारे भारत सोडून जाण्याच्या तयारीत होते. तपासात असे निष्पन्न झाले की, या प्रवाशांनी सोने आपल्या शरीरात लपवून भारतात आणले होते.
डीआरआयने एकूण ३.२ किलो २४-कॅरेट सोने (मेणाच्या स्वरूपात) जप्त केले, ज्याची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे. हे सोने ‘कस्टम्स ॲक्ट, १९६२’ (सीमा शुल्क कायदा) च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे तस्करीचे संपूर्ण जाळे उघड झाले आणि सात जणांना अटक करण्यात आली: यात तीन ट्रान्झिट प्रवासी, तीन विमानतळ कर्मचारी आणि एका स्थानिक रिसीव्हरचा समावेश आहे.
डीआरआयने नमूद केले की, परकीय चलन साठा आणि आर्थिक सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकारने सोन्यावरील सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) आणि कर वाढवले असतानाच हे यश मिळाले आहे. ही कारवाई डीआरआयचे सक्षम गुप्तचर जाळे, जलद कार्यक्षमता आणि संघटित तस्करी टोळ्यांविरुद्धची प्रभावी कारवाई यांचे उत्तम उदाहरण मानली जात आहे.






