Mumbai: भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी
काय घडलं नेमकं?
आरोपीचे नाव आकाश माधव अंभोरे असे आहे. तो फिर्यादी सुनंदा अशोक (६४) यांना २०१८ पासून ओळखत होता. सुनंदा यांच्या पतीच्या निधनानंतर त्या एकट्या राहत होत्या. त्यांच्या आजारपणामुळे दवाखान्यात जाण्यासाठी त्या नेहमी आकाशच्या रिक्षेचा वापर करत होत्या. त्यामुळे त्यांचा विश्वास आकाशवर होता.
मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून आकाश रोज संध्याकाळी त्यांच्या घरी येत होता. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो त्यांच्या घरी आला. त्याने प्यायला पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी सुनंदाबाई स्वयंपाकघरात गेल्या, तेव्हा त्याने मागून येत रुमालाने त्यांचा गेला आवळला. श्वास कोंडल्याने त्या बेशुद्ध पडल्या.
काही वेळाने त्यांना शुद्ध आली. शुद्धीवर आल्यांनतर त्यांच्या गळ्यातील पाच टोळ्यांची ५३ मण्यांची रुद्राक्ष माळ आणि अडीच तोळ्यांची ८४ मण्यांची तुळशीमाळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ नातेवाईकांना कळवून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला शोधायला सुरुवात केली. गुन्हे शाखा, जवाहरनगर आणि उस्मानपुरा पोलिसांची पथकेही तपासात सहभागी झाली. तांत्रिक तपासातून आरोपीचे लोकेशन कमळापूर फाटा परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन पाहताच आरोपीने स्पोर्ट्स
बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी घसरल्याने तो खाली पडला. तरीही तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला गजाआड केले.
सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पीडित आणि अत्याचार करणारे विध्यार्थी हे सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. ही घटना एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये घडली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Ans: छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर परिसरात.
Ans: पीडित वृद्धेला परिचित असलेला रिक्षाचालक.
Ans: तांत्रिक तपास करून काही तासांत आरोपीला अटक केली.






