Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia Crime: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली पोस्ट चिठ्ठी, नंतर…

गोंदियातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 12, 2025 | 09:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

गोंदियातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली. व्हाट्सअप ग्रुपवरील चिठ्ठी पाहताच मित्रांनी त्याच्या रूममध्ये धाव घेतली, आणि विद्यार्थ्याचे प्राण वाचविले. त्याच्यावर गोंदिया येथील वैधकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

क्रिकेट खेळण्यावरून झाला वाद; व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून हातपाय तोडले अन् मुलांनाही…

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्या विद्यार्थ्याने हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली व त्यानंतर गळफास घेतला. मात्र ती चिठ्ठी वर्ग मित्रांनी बघताच तो राहत असलेल्या रूमवर त्यांनी धाव घेतली, आणि त्याचे प्राण वाचविले. विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे.

ही घटना गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील भाड्याच्या खोलीत रविवारी मध्यरात्रीनंतर 1.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाव आवेश कुमार (२२ वर्षीय) आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. सिव्हिल लाइन्स परिसरातील शीतला माता मंदिर चौकात आवेश भाड्याच्या खोलीत राहत होता. आवेशने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी व्हाट्सअॅपला मॅसेज केला होता. त्याचा हा मॅसेज येताच त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या खोलीवर धाव घेत त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून काढून उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

चिठ्ठीत काय?
वारंवार तक्रार करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्याने सांगितलं आहे. “मी स्वतः रुग्ण असून सहानुभूतीची अपेक्षा होती, मात्र मला अपमानास्पद वागणूक मिळाली. मी चूक केली, पण ती इतकी मोठी नव्हती की त्यासाठी माझ्या आई व कुटुंबाबद्दल नको ते बोलावं,” असे त्याने त्या पत्रात लिहिलं असून, संबंधित वर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. या चिठ्ठीत त्याने एका प्राध्यापकाच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं; भाजप जिल्हा उपाध्यक्षासह एकाची निर्घृण हत्या, एकजण गंभीर जखमी

Web Title: Gondia crime tired of the professors harassment he took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • crime
  • gondia news

संबंधित बातम्या

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य
1

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य

Nashik Crime: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; लाखोंचा गंडा
2

Nashik Crime: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक; लाखोंचा गंडा

Nanded Crime:पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवलं आणि…; दोन मुली आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले
3

Nanded Crime:पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवलं आणि…; दोन मुली आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले

Nashik Crime : साधूच्या वेशात आले, हाताला रक्षा बांधली आणि…; तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज केला लंपास, नाशिकमधील घटना
4

Nashik Crime : साधूच्या वेशात आले, हाताला रक्षा बांधली आणि…; तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज केला लंपास, नाशिकमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.