crime (फोटो सौजन्य: social media)
गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने गोंदिया जिल्हा हादरून गेला आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आले आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार केला. मात्र पोलिसांना संशय आला आणि मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता सत्य समोर आलं.
बांगलादेशात हिंदू महिलेवर अमानुष अत्याचार; दोन चिमुकल्या मुलीसमोर मारहाण आणि बलात्कार….
नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव भारती सहारे( वय ४४) असे आहे. खर्चासाठी त्यांनी आपल्या मुलाला पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच गळा दाबून आणि डोके जमिनीवर आपटून जन्मदात्याला आईचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. भारती सहारे आपल्या १७ वर्षीय मुलासोबत राहत होती. तिच्या पतीच्या निधनानंतर ती गावातच नड्डे आणि अंडी विकून आपला उदरनिर्वाह करत होती. भरतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता. पैसे मागण्यावरून २६ जूनच्या रात्री दोन्ही मायकेकांत वाद झाला. या वादात मुलाने आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले आणि यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्याने नातेवाईकांना आईचा मृत्यू नैसर्गिक झाला असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार केले. मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर या घटनेचे बिंग फुटलं. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पूढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
जालना हादरलं! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाची अपहरण करून हत्या
जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळू टाकण्याच्या वादातून वाळूमाफियांनी अपहरण करून एका तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. हत्या केल्यानंतर मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील तढेगाव येथे फेकून देण्यात आला. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुरेश आर्दड (३३) असे आहे. रविवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.
भर रस्त्यावर कटरने परिचारिकेवर सपासप वार; संतप्त जमावापासून बचावासाठी आरोपी शिरला पोलीस ठाण्यात