वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ धक्कादायक घटना घडली आहे. परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. कटरने हातावर घाव मारत यात परिचारिकेला गंभीर स्वरूपात जखमी केलंय आणि आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र जमाव पाठीमागे लागल्याने अखेर तरुणाने रस्त्यावरच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश घेत शरणागती पत्करली. मोठ्या जमावाने पाठलाग सुरु केल्याने आणि त्यातून सुटका होणार नाही या धारणेतून त्याने थेट रामनगर पोलीस ठाण्यात शरण घेतली. यामुळे आरोपी संतप्त जमावाच्या तावडीतून बचावला.
जालना हादरलं! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाची अपहरण करून हत्या, मृतदेह बुलढाण्यात फेकला
पुढे आलेल्या माहितीनुसार, एका खाजगी रुग्णालयात २४ वर्षीय तरुणी परिचारिका म्हणून काम करीत होती. रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर तिला सौरभ रवींद्र क्षीरसागर (वय 29 राहणार भुगाव) हा तरुण भेटला. काही काळानंतर अचानक तरुणीसोबत बोलता असतांना त्याने जवळ असलेले कटर बाहेर काढले आणि तिच्यावर सपासप वार केले. यात ती जखमी झाली. ही घटना घडताच परिसरातील सौरभने घटनास्थळावरून पळ काढला. तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी पाठलाग केल्याने त्याने अखेर रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी शरनागती पत्करली. ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे. या प्रकरणी अद्याप वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पूढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Accident News : नगर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकवर टेम्पो आदळून चालकाचा मृत्यू
पुणे : नगर रस्त्यावर केसनंद फाटा येथे भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजन गंभीर जखमी झाला आहे. ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४, रा. गोगलगाव, ता. राहता, जि. अहिल्यानंगर) असे मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. अपघातात टेम्पोतील क्लिनर सुनील किशोर नेहे (वय २२, रा. डिग्रस, ता. राहता, जि. अहिल्यानगर) जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत ट्रकचालक विक्रम विठ्ठल बाबर (वय ३७, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Indigo Flight: पुणे-हैदराबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; ‘या’ कारणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर