Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडीचालक ते टोळीप्रमुख, पुण्यातील धनकवडीत वास्तव्य; ‘असा’ आहे बापू नायरचा गुन्हेगारी इतिहास

बापू प्रभाकर नायर मुळचा केरळ राज्यातील वायनाळ जिल्ह्याच्या मिनागांडर गावचा. पण, आई-वडिल उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले. त्यांनी धनकवडीत वास्तव्य केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2025 | 01:16 PM
गाडीचालक ते टोळीप्रमुख, पुण्यातील धनकवडीत वास्तव्य; 'असा' आहे बापू नायरचा गुन्हेगारी इतिहास

गाडीचालक ते टोळीप्रमुख, पुण्यातील धनकवडीत वास्तव्य; 'असा' आहे बापू नायरचा गुन्हेगारी इतिहास

Follow Us
Close
Follow Us:
  • गाडीचालक ते टोळीप्रमुख
  • पुण्यातील धनकवडीत वास्तव्य
  • वाचा बापू नायरचा गुन्हेगारी इतिहास
पुणे/अक्षय फाटक : उपजिविकेच्या शोधात परराज्यातून पुण्यात आलेल्या कुटुंबातील एका साध्या मुलाचं आयुष्य… दहावीपर्यंत शाळा, नंतर गाडी चालवून घर सांभाळण्याचा प्रामाणिक संघर्ष. पण मित्रांमधील तुच्छ भांडणातून पोलिस ठाण्यापर्यंत गेलेली पायरी अखेर गुन्हेगारीच्या गर्तेत खेचते आणि कालपर्यंत गाडी चालविणारा चालकच पुढे शहर हादरवणाऱ्या टोळीचा ‘प्रमुख बनतो, तो बापू नायर.

बापू प्रभाकर नायर मुळचा केरळ राज्यातील वायनाळ जिल्ह्याच्या मिनागांडर गावचा. पण, आई-वडिल उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले. त्यांनी धनकवडीत वास्तव्य केले. तिथेच व्यवसाय देखील सुरू केला. तेव्हा बापू नायर शालेय शिक्षण घेत होता. त्याने बिबवेवाडीत दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर शिक्षण सोडले. शिक्षणानंतर बापू नायरने चारचाकीवर चालक म्हणून काही वर्ष काम केले.

२००१ मध्ये पहिला गुन्हा

बापू नायर गुन्हेगारीपासून लांब होता. पण, २००१ मध्ये त्याच्या मित्राच्या भांडणातून त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. तेव्हापासून तो गुन्हेगारीत शिरला. गुन्हेगारीतून त्याने ओळख निर्माण करत मित्रांची एक साथ निर्माण केली.

टोळी निर्माण केली

एका गुन्ह्यानंतर स्थानिक एका टोळीप्रमुखाच्या साथीने त्याने व त्याच्या साथीदारांनी बिबवेवाडी, कोंढवा तसेच धनकवडी तसेच सहकारनगर या भागात बापू नायर टोळीचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण केले. खूनाचे प्रयत्न, मारामारी, भांडणे, खंडणी अशा गुन्ह्यातून तो या भागातील भाई झाला. काही महिन्यात त्याची गुन्हेगारी टोळी झाली आणि त्यानंतर बापू नायर गँग निर्माण झाली.

बैजु नवघणेचा खून

बिबवेवाडी तसेच आसपासच्या परिसरात बापू नायर तसेच गुंड बैजु नवघणे यांच्यात वाद होते. दोघांमध्ये वर्चस्वावरून देखील दुश्मनी होती. सातत्याने त्यांच्यात वादविवाद होत होते. त्यात या भागात देवीची तोरण मिरवणूक निघत असत. ही मिरवणूक म्हणजे, त्याकाळी मानाची मिरवणूक असत. २०११ देवीच्या मिरवणूकीत बैजु नवघणे व बापू नायर यांच्यात वाद झाल्यानंतर बापू नायर टोळीने बैजु याचा खून केला होता. आणि खऱ्या अर्थाने बापू नायर टोळीची पुण्यात दहशत निर्माण झाली. या गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई केली होती. या गुन्ह्यात निर्दोश मुक्ताता झाली.

गजानन मारणे व बापू नायर एकत्र

कोथरूड भागात त्या काळी उदयास आलेला व येत असलेला गँगस्टर गजानन मारणे आणि बापू नायर यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. कोथरूड भागात बापू नायर गजानन मारणे याच्या साथीने केबल व्यवसाय करत होता. त्यामुळे त्यांच्यात चांगले संबंध होते.

दहशतीसाठी तोडफोड

बिबवेवाडी व आसपासच्या परिसरात बापू नायर टोळीकडून सातत्याने दहशतीचे साम्राज्य उभे केले जात होते. रस्त्यावरील वाहने तोडफोड करून दहशत माजविण्यात येत होती. त्यामुळे आपसाकूच परिसरात दहशत पसरत असत.

एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा

बापू नायर याच्यावर २०१५ मध्ये खूनाचा प्रयत्न यासह वेगवेगळ्या कमलांनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात तो अटक होता. त्याचवेळी सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात न्यायालयाने बापू नायरला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.

बापू नायरला मारटकर खूनप्रकरणात अटक

बापू नायर २०१५ पासून कारागृहात होता. तो २०२१ मध्ये कारागृहातून बाहेर आला. दरम्यान, २०२० मध्ये तेव्हाच्या शिवसेना युना सेनेचा नेता दिपक मारटकर याचा खून झाला होता. स्वप्नील मोढवे या खूनातील मुख्य आरोपी, बापू नायर कारागृहातून चेकपसाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर मारटकर खूनापुर्वी स्वप्नील मोढवे, बापू नायरला भेटला होता. मारटकर खूनात स्वप्नील याला अटक करून चौकशी केल्यानंतर ससून रुग्णालयातील भेट समोर आली होती. त्यानंतर या गुन्ह्यात बापू नायरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, २०२४ मध्ये बापू नायर या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला आहे.

कोणताही गुंड राजकीय वरदहस्त असल्याशिवाय मोठा होत नाही किंवा तो गँगस्टर म्हणून नावारूपाला येत नाही, हे खर तस या गुंडाचा राजकीय वापर देखील तशाच पद्धतीने होते, हेही तितकच खर. बापू नायर यासोबतच शहरातील गँगस्टरचा त्या-त्या काळच्या राजकीय परिस्थितीनुसार वापर करून घेण्यात आल्याचे पोलिस खासगीत सांगतात. गुंड असले तरी त्यांच्याकडे असलेल्या तरुणांचा राजकीय वापर होतो. त्याप्रमाणे बापू नायरचा देखील योग्य पद्धतीने वापर झाला. मात्र, राजकीय गरज संपल्यानंतर दुर्लक्षित झाले.

बापू नायरचे वलय बिबवेवाडी, कोंढवा, सहकारनगर, कात्रज या भागात आहे. त्याचा नंबरकारी निलेश बसवंत देखील मोठा गुन्हेगार आहे. सध्या तो परराज्यात असल्याचे पोलिस सांगतात. सध्या गेल्या काही वर्षांपासून बापू नायर टोळीचे गुन्हेगारीत अॅक्टीव्हपण दिसत नसल्याचेही पोलिस सांगतात.

Web Title: Goon bapu nair has committed many crimes in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Dr. Gauri Palve Case update:  गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक
1

Dr. Gauri Palve Case update: गौरी पालवे प्रकरणात वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…
2

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री धुडगूस! मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक; मी पोलिसाचा मुलगा…

Nashik Crime: सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! माजी संचालकांच्या धनादेशाचा गैरवापर, खोट्या सह्या करून काढले कर्ज
3

Nashik Crime: सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! माजी संचालकांच्या धनादेशाचा गैरवापर, खोट्या सह्या करून काढले कर्ज

Hyderabad Airport Bomb Threat:  हैदराबाद विमानतळाला पुन्हा बॉम्बची धमकी; २३ दिवसांत चौथी घटना
4

Hyderabad Airport Bomb Threat: हैदराबाद विमानतळाला पुन्हा बॉम्बची धमकी; २३ दिवसांत चौथी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.